Join us

मिनिमम बॅलन्समधून PNB ने कमावले कोट्यवधी रुपये; ATM मधील कमाई पाहतच रहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 8:51 AM

PNB minimum balance: पंजाब नॅशनल बँक (PNB) ने 2020-21 मध्ये खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स नसल्या कारणाने ग्राहकांना दंड केला आहे. एका RTI मध्ये ही माहिती समोर आली आहे.

पंजाब नॅशनल बँक (PNB) ने 2020-21 मध्ये खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स नसल्या कारणाने ग्राहकांना दंड केला आहे. हा दंड एवढा आहे की, पीएनबीने या वर्षात तब्बल 170 कोटी रुपये कमावले आहेत. एका RTI मध्ये ही माहिती समोर आली आहे. या पद्धतीने शुल्क आकारणी करून बँकेचा नफा 2019-20 हा 286.24 कोटी रुपये होता. तिमाहीच्या आधारावर हे शुल्क लावले जाते. (PNB earns Rs 170 crore in FY21 by levying charges on non-maintenance of minimum balance)

2020-21 च्या एप्रिल-जूनमध्ये तिमाही सरासरी शिल्लक रक्कमेवरील दंड हा ही 35.46 कोटी रुपये एवढा होता. तर 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत अशाप्रकारचे कोणतेही शुल्क आकारण्यात आले नव्हते. मध्य प्रदेशचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांच्याद्वारे ही माहिती मागविण्यात आली होती. तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत हे शुल्क 48.11 आणि 86.11 कोटी एवढे आकारण्यात आले होते. बँकेने याच वर्षात एटीएम व्यवहारांतून 74.8 कोटी रुपये कमविले आहेत. 2019-20 मध्ये बँकेने एटीएमद्वारे 114.08 रुपये कमविले होते. 2020-21 मध्ये पहिल्या तिमाहीत एटीएम शुल्क माफ करण्यात आले होते. 

पंजाब नॅशनल बँकेत 30 जून, 2021 पर्यंत 4,27,59,597 खाती निष्क्रिय होती. तर 13,37,48,857 खाते सुरु होते. 

कोटक महिंद्रा बँक करणार 310 कोटींची गुंतवणूककोटक महिंद्रा बँक General Atlanticच्या KFin Technologies ची 9.99 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. यासाठी बँक KFin Technologies मध्ये 310 कोटी रुपये गुंतविणार आहे. सोमवारी दुपारी एनएसईवर कोटकचा शेअर 2.10 रुपयांनी वाढून 2010.05 वर सुरु होता. 

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक