नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपली २१ अनुत्पादक भांडवल (एनपीए) खाती विक्रीला काढली आहेत. या खात्यांत १,३२0.१९ कोटी रुपये थकलेले असून, ते वसूल करण्यासाठी बँकेने ही खातीच विकून टाकण्याचा पर्याय निवडला आहे.पीएनबीने निवदेनात म्हटले आहे की, बँकेच्या स्ट्रेसड अॅसेट टार्गेटेड रिझोल्युशन अॅक्शन (सास्त्रा) विभाग या खात्यांची विक्री हाताळत आहे. अॅसेट रिझोल्युशन कंपन्या (एआरसी), बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी), इतर बँका व वित्तीय संस्थांना ही खाती विकली जातील.विक्रीला ठेवलेल्या कर्ज खात्यांत मोसेर बायर सोलार (थकबाकी : २३३.0६ कोटी), डिव्हाईन अॅलॉय अॅण्ड पॉवर (थकबाकी : २00.८७ कोटी), डिव्हाईन विद्युत (थकबाकी : १३२.६६ कोटी), चिंचोली शुगर अॅण्ड बायो इंडस्ट्रीज (थकबाकी ११४.४२ कोटी), अर्शिया नॉर्दर्न एफटीडब्ल्यूझेड (थकबाकी : ९६.७0 कोटी), बिर्ला सूर्या (थकबाकी : ७३.५८ कोटी), श्री साईकृपा शुगर अॅण्ड अलाईड इण्डस्ट्रीज (६३.३५ कोटी) व राजा फोर्जिंग अॅण्ड गीअर्स लि. (थकबाकी : ५९.७३ कोटी) यांचा समावेश आहे.याशिवाय टेम्पल्टन फूडस्, परित्राण मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल, राठी इस्पात, जेम्स हॉटेल, जैन ओव्हरसीज, धर्मनाथ इन्व्हेस्टमेंट, द मोबाईल स्टोअर सर्व्हिसेस, अॅव्हॉन लाईफ सायन्सेस, झूम वल्लभ स्टील, कॉलेज इस्टेट प्रा.लि., क्राऊन मिल्क स्पेशालिटीज आणि गुरुकुल एज्युकेशन अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट यांची कर्ज खातीही बँकेने विक्रीला ठेवली आहेत.
पीएनबीने २१ एनपीए खाती काढली विक्रीला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:57 AM