Join us

PNB Cardless Withdrawal : पीएनबी ग्राहकांसाठी खुशखबर! बँकेने सुरू केली 'ही' नवीन सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 5:54 PM

PNB Cardless Withdrawal : ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता ग्राहकांना कार्ड न वापरता एटीएममधून (ATM) पैसे काढता येणार आहेत.

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील नेते पंजाब नॅशनल बँकेने (PNB) एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ बँकेच्या करोडो ग्राहकांना मिळणार आहे. नवीन सुविधेअंतर्गत, बँकेने ग्राहकांसाठी व्यवहार अधिक सोयीस्कर आणि सुलभ करण्यासाठी कार्डशिवाय पैसे काढण्याची (PNB Cardless Cash Withdrawal) सुविधा सुरू केली आहे.

ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता ग्राहकांना कार्ड न वापरता एटीएममधून (ATM) पैसे काढता येणार आहेत. याशिवाय बँकेने व्हर्च्युअल डेबिट कार्डही (Virtual Debit Card) सुरू केले आहे. 128 व्या स्थापना दिनानिमित्त बँकेने आपल्या ग्राहकांसाठी सुरक्षित बँकिंग व्यवहार सक्षम करण्यासाठी PNB One मोबाइल अॅपवर निवडक डिजिटल सेवांची नवीन सीरीज सुरू केली आहे.

बँकेकडून अनेक नवीन सुविधा सादरफायनान्सियल सेक्टरमध्ये रिकव्हरीच्या मजबूत मार्गावर पीएनबीमध्ये (PNB) मजबूत वाढ दिसून येत आहे. यासह, बँकेने अनेक नवीन सुविधा सादर करून डिजिटल परिवर्तनासाठी आपली वचनबद्धता पुन्हा परिभाषित केली आहे, असे पंजाब नॅशनल बँकेचे एमडी आणि सीईओ अतुल कुमार गोयल  (Atul Kumar Goyal) यांनी सांगितले. 

कशी असेल कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा?एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा देशातील काही बँकांनी यापूर्वीच सुरू केली आहे. परंतु या सुविधेअंतर्गत ग्राहक त्याच बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतो, ज्यामध्ये त्याचे खाते आहे. एटीएममधून अशा व्यवहारांसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरला जातो.

काय होईल फायदा?एकामागून एक अनेक बँका कार्डशिवाय पैसे काढण्याची प्रणाली लागू करत आहेत. या सुविधेच्या अंमलबजावणीनंतर, कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढताना स्किमिंग, कार्ड क्लोनिंग किंवा डिव्हाइस टॅम्परिंग यांसारख्या फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आर्थिक वर्षाच्या पहिल्या MPC बैठकीत सर्व बँकांसाठी कार्ड-लेस कॅश काढण्याची सुविधा सुरू करण्याबद्दल सांगितले होते.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकएटीएमपैसाव्यवसाय