Join us

आयुर्वेदिक उत्पादनानंतर रामदेव बाबांनी लॉन्च केले क्रेडिट कार्ड; जाणून घ्या त्याचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 12:38 PM

Credit Cards : को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्स नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या RuPay प्लॅटफॉर्मवर ऑफर केले आहे. हे PNB RuPay Platinum आणि PNB RuPay सिलेक्ट या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

नवी दिल्ली : योग आणि आयुर्वेदाने जगभरात ओळख निर्माण केल्यानंतर पतंजलीने आता स्वतःचे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. हे क्रेडिट कार्ड पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने (PAL) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या भागीदारीत लॉन्च केले आहे. को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्स नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या RuPay प्लॅटफॉर्मवर ऑफर केले आहे. हे PNB RuPay Platinum आणि PNB RuPay सिलेक्ट या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

दोन्ही को-ब्रँडेड कार्ड्स पतंजली उत्पादने खरेदी करण्यासाठी अडचण मुक्त क्रेडिट सेवा देतात तसेच कॅश बॅक, लॉयल्टी पॉइंट्स, विमा संरक्षण आणि इतर काही सुविधा आहेत. कार्ड लाँच झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत, कार्डधारकांना पतंजली स्टोअरमध्ये 50 रुपयांच्या प्रति व्यवहाराच्या मर्यादेच्या अधीन 2500 रुपये वरील व्यवहारांसाठी 2 टक्के योग्य कॅशबॅकचा आनंद घेता येईल. प्रति व्यवहार कॅशबॅकची मर्यादा 50 रुपये असेल.

याशिवाय, PNB RuPay Platinum आणि PNB RuPay सिलेक्ट कार्डधारकांना अॅक्टिव्हेशनवर 300 रिवॉर्ड पॉइंट्सचा वेलकम बोनस मिळेल. तसेच, ग्राहकांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंज एक्सेस, कार्ड व्यवस्थापनासाठी PNB Genie मोबाइल अॅप्लिकेशन, अॅड-ऑन कार्ड सुविधा, खर्चावर आकर्षक रिवॉर्ड पॉइंट्स, EMI आणि ऑटो-डेबिटची सुविधा मिळेल.

प्लॅटिनम आणि सिलेक्ट कार्ड्स अॅक्सिडेंटल डेथ आमि पर्सनल टोटल डिसएबिलिटीसाठी अनुक्रमे 2 लाख आणि 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. प्लॅटिनम क्रेडिट कार्डवर 25,000 रुपये ते 5 लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा उपलब्ध असेल. तसेच, सिलेक्ट कार्डवर 50,000 रुपये ते 10 लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा उपलब्ध असेल. प्लॅटिनम कार्डवर झिरो जॉइनिंग फी असेल. दरम्यान, यामध्ये 500 रुपये वार्षिक शुल्क असेल. दुसरीकडे, सिलेक्ट कार्डवर 500 रुपये जॉइनिंग फी आणि 750 रुपये वार्षिक शुल्क असेल.

टॅग्स :पतंजलीरामदेव बाबाव्यवसाय