स्वस्तात घर, दुकान किंवा जमीन खरेदीचा चांगली संधी पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) उपलब्ध करून दिली आहे. पीएनबीकडून १२ ऑगस्ट २०२१ रोजी मेगा ई-लिलाव (PNB Mega E-Auction) आयोजित करण्यात आला आहे. यात हाऊसिंग, रेसिडेंशिअल, कमर्शिअल आणि इंडस्ट्रियल अशा प्रत्येक प्रकारच्या प्रॉपर्टीचा समावेश आहे. तुम्ही सुद्धा या लिलावात सहभागी होऊन स्वस्त दरात घर, दुकान किंवा जमीन खरेदी करू शकता. (PNB Mega E Auction on 12 August 2021 gives you just the right opportunity)
पंजाब नॅशनल बँकेकडून ट्विट करुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. "रेसिडेंशिअल आणि कमर्शियल प्रॉपर्टीच्या शोधात तुम्ही असाल तर पीएनबीच्या मेगा ई-लिलावाच्या माध्यमातून सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बँकेचं कर्ज फेडण्यास असमर्थ ठरलेल्यांच्या प्रॉपर्टींचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. लिलावा संदर्भातील संपूर्ण माहिती इंडियन बँक्स ऑक्शन मॉर्गेज प्रॉपर्टीज इन्फॉरमेशन म्हणजेच IBAPI वर उपलब्ध आहे. याचं आयोजन इंडियन बँक्स असोसिएशनकडून करण्यात आलं आहे.
पीएनबीच्या लिलावात एकूण १४११७ रेसिडेंशिअल प्रॉपर्टी आणि ३१७५ कमर्शिअल प्रॉपर्टींचा समावेश आहे. याशिवाय १५७४ इंडस्ट्रीयल, १०५ अॅग्रीकल्चर प्रॉपर्टीचा समावेश आहे.
लिलावात कसा घ्याल सहभाग?ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी नोटीसमध्ये जारी करण्यात आलेल्या प्रॉपर्टीपैंकी तुम्हाला ईएमडी जमा करावी लागेल. संबंधित बँकेच्या शाखेत तुम्हाला तुमची ओळखपत्र दाखवावी लागतील. लिलावात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला डिजिटल स्वाक्षरी असणं गरजेचं आहे. नाहीतर ई-लिलावकर्ता किंवा इतर अधिकृत एजन्सीशी संपर्क करता येईल.
संबंधित बँक शाखेत ईएमडी जमा केल्यावर आणि केवायसी डॉक्यूमेंट दाखवल्यानंतर बोली लावणाऱ्याच्या ई-मेल आयडीवर लॉगइन आयडी व पासवर्ड पाठविण्यात येईल. लिलावाच्या नियमांनुसार ई-लिलावाच्या दिवशी वेळेत लॉगइन करुन बोली लावता येणार आहे.