नवी दिल्ली : या दिवाळीत तुम्हीही स्वस्त घराच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्तवाची आहे. दरम्यान, पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. पंजाब नॅशनल बँक मालमत्तेचा लिलाव करणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला घर (Residential Property) स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (PNB Mega E-Auction To Give Golden Opportunity For Buy Property)
28 ऑक्टोबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी मालमत्तांचा समावेश आहे. लिलाव करण्यात येणाऱ्या मालमत्ता या डीफॉल्टच्या यादीमधील आहेत. दरम्यान, याविषयीची माहिती IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) आहे.
कधी होणार लिलाव?पंजाब नॅशनल बँकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, 28 ऑक्टोबर 2021 रोजी मेगा ई-लिलाव केला जाईल. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा ई-लिलाव केला जाईल. तुम्ही याठिकाणी वाजवी किंमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.
कोठे करावे लागेल रजिस्ट्रेशन?पंजाब नॅशनल बँकेच्या मेगा ई-लिलावासाठी इच्छुक बोलीदारांना e-Bikray पोर्टल https://ibapi.in/ वर रजिस्ट्रेशन करावे लागेल. या पोर्टलवर 'बिडर्स रजिस्ट्रेशन' वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
KYC डाक्युमेंटची आवश्यकताबोलीदाराला आवश्यक केवायसी डॉक्युमेंट अपलोड करावी लागतील. ई-लिलाव सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे केवायसी डॉक्युमेंटची पडताळणी केली जाईल. यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो.
अशावेळी बँक करते लिलावदरम्यान, मालमत्तेच्या मालकांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केलेली नाही. काही कारणाने देऊ शकले नाहीत. त्या सर्व लोकांच्या मालमत्ता बँकांनी ताब्यात घेतल्या आहेत. अशा मालमत्तांचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते.