Join us

पीएनबीला हवे ५,४३१ कोटी  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 5:16 AM

केंद्र सरकारकडून ५,४३१ कोटी रुपयांचे भांडवली समर्थन मागण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) बोर्ड चर्चा करणार आहे.

नवी दिल्ली  - केंद्र सरकारकडून ५,४३१ कोटी रुपयांचे भांडवली समर्थन मागण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) बोर्ड चर्चा करणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी भांडवली समर्थन मागितल्यास त्यावर विचार केला जाईल. त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेने यावर विचार करण्यास बैठक बोलाविली आहे. या बैठकीत ५,४३१ कोटी रुपयांचे इक्विटी शेअर जारी करण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच, शेअरधारकांची मंजुरी घेण्यास बैठक आयोजित करण्याची तारीख निश्चित करण्यात येईल. पीएनबीने या बैठकीची माहिती स्टॉक एक्सचेंजला दिली आहे.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकबातम्या