मुंबई : पंजाब नॅशनल बँक, पतंजली आयुर्वेदने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या भागीदारीमध्ये कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड सादर केले आहे. पीएनबी रुपे प्लॅटिनम आणि पीएनबी रुपये सिलेक्ट या दोन प्रकारांमध्ये क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत.
ग्राहकांसाठी अनेक आकर्षक फायदे आणि कमी खर्चामध्ये हे क्रेडिट कार्ड देण्यात आले आहे. यामध्ये कॅशबॅक, लॉयल्टी पॉइंट्स, विमा कवच आणि पतंजली उत्पादने खरेदी केल्यावर २ टक्केपेक्षा अधिक कॅशबॅकची सुविधा देण्यात आली आहे.
पीएनबी रुपये प्लॅटिनम आणि पीएनबी रुपये सिलेक्ट कार्डधारकांना ३०० रिवॉर्ड पॉइंट्सचा वेलकम बोनस मिळेल. कार्डधारकाला अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अनुक्रमे २ लाख आणि १० लखांचा विमा मिळेल.
पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री आचार्य बाळकृष्ण म्हणाले, या भागीदारीतील क्रेडिट कार्डमुळे टियर २ आणि टियर ३ बाजारपेठेतील वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंटचा आनंद घेता येणार आहे. आकर्षक फायद्यांव्यतिरिक्त, पतंजली उत्पादने खरेदी करताना ५० दिवस व्याजमुक्त खरेदी करता येईल. (वा.प्र)
credit card: पीएनबीचे पतंजलीसोबत क्रेडिट कार्ड सादर, मिळतील अशा सुविधा
पंजाब नॅशनल बँक, पतंजली आयुर्वेदने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या भागीदारीमध्ये कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड सादर केले आहे. पीएनबी रुपे प्लॅटिनम आणि पीएनबी रुपये सिलेक्ट या दोन प्रकारांमध्ये क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 06:58 AM2022-02-01T06:58:05+5:302022-02-01T06:59:11+5:30