Join us  

PNB ची दमदार कामगिरी; १०२३ कोटींचा निव्वळ नफा; २३१ टक्क्यांची घसघशीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 12:38 PM

PNB: कोरोना संकटाच्या काळातही अनेकविध क्षेत्रातील कंपन्यांना भरघोस फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या काळातही अनेकविध क्षेत्रातील कंपन्यांना भरघोस फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही कंपन्यांचा निव्वळ नफा शतपटीने वाढला आहे. यात बँकिंग क्षेत्राचाही समावेश असून, सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेला (PNB) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १ हजार ०२३ कोटींचा निव्वळ नफा झाल्याची माहिती मिळाली आहे. (pnb Q1 profit jumps 231 percent to rs 1023 crore as provisions fall)

थकीत कर्जांसाठी कमी तरतूद समर्थन आणि मालमत्तेच्या गुणवत्तेमध्ये स्थिरता यामुळे पीएनबीच्या कमाईला चालना मिळाली असून तिमाहीत बँकेचे तरतूद समर्थन जवळजवळ ४६७८ कोटी रुपये राहिले. तर NPA मालमत्तेसाठीची तरतूद ३२ टक्के दरवर्षी घटून ३२४८ कोटी रुपयांवर आली आहे, असे सांगितले जात आहे. 

Adani Group चा आता महाराष्ट्र, छत्तीसगडमधील खाणींवर ताबा; लिलावात सर्वाधिक बोली!

बँकेचा निव्वळ नफा ७४ टक्के जास्त झाला

बँकेला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १ हजार ०२३ कोटींचा निव्वळ नफा झाला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात २३१ टक्क्यांची वाढ झाली आहे. या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआईआई) एक वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत ६.५ टक्क्यांनी वाढून ७२२६ कोटी रुपये झाले. मार्च तिमाहीत ५८६ कोटी रुपयांच्या तुलनेत बँकेचा निव्वळ नफा ७४ टक्के जास्त झाला आहे. 

Vi मोजतंय अखेरच्या घटका! बिर्ला यांची मोठी ऑफर; सरकारच्या ताब्यात जाणार कंपनी?

तिमाहीत बँकेचा सकल एनपीए वाढून १४.३३ टक्क्यांवर 

निव्वळ व्याज उत्पन्न हे बँकेचे एकूण व्याज उत्पन्न आणि ठेवीदारांना दिलेले एकूण व्याज यांच्यातील फरक आहे. तिमाहीत बँकेचा सकल एनपीए वाढून १४.३३ टक्क्यांवर पोहोचला जो वर्षभरापूर्वी याच कालावधीत १४.११ टक्के होता. जानेवारी ते मार्च कालावधीत बँकेचा एकूण एनपीए १४.१२ टक्के होता. एप्रिल-जून तिमाहीत पीएनबीचा निव्वळ एनपीए ५.८७ टक्के होता जो जानेवारी ते मार्च तिमाहीत ५.७३ टक्के आणि एप्रिल ते जून २०२० मध्ये ५.३९ टक्के होता. 

मालामाल! इंधनदरवाढीमुळे ‘या’ कंपनीची भन्नाट कमाई; तब्बल ५ हजार ९४१ कोटींचा नफा

दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अद्यापही अनिश्चित आहे. त्याचे सतत मूल्यांकन केले जात आहे. रोख प्रवाहाची घसरण आणि कार्यरत भांडवली चक्रातील विस्तार हे बँकेसाठी सर्वात मोठे आव्हान असेल. ही आव्हाने पेलण्यासाठी सर्व आघाड्यांवर आपला वेग वाढवत आहे, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकव्यवसायबँकिंग क्षेत्र