मुंबई - पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुनील मेहता बुधवारी गंभीर घोटाळा तपास कार्यालयात (एसएफआयओ) जबाब नोेंदविण्यासाठी हजर झाले. पीएनबीमध्ये नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी केलेल्या १२,७00 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना कार्यालयाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती.
हिºयांचे व्यापारी मोदी-चोकसी यांनी केलेल्या घोटाळ्याप्रकरणी ‘एसएफआयओ’चे बोलावणे आलेली पीएनबी ही गेल्या दोन दिवसांतील तिसरी बँक ठरली आहे. मेहता हे सकाळी ११.00 वाजता घोटाळा-विरोधी तपास संस्थेच्या कार्यालयात प्रवेश करीत असल्याचे दिसून आले. अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाºयांनी काल तपास संस्थेसमोर हजेरी लावली होती.
मेहता यांच्यासह पीएनबीचे कार्यकारी संचालक के. व्ही. ब्रह्माजी राव यांना सीबीआयने गेल्या महिन्यात चौकशीसाठी बोलावले होते. घोटाळा कसा उघडकीस आला, याची माहिती घेण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते, असे सीबीआयच्या अधिकाºयांनी सांगितले. मेहता आणि राव यांना आरोपीची वागणूक देण्यात येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एसएफआयओ ही संस्था कंपनी व्यवहार मंत्रालयांतर्गत काम करते. मोदी-चोकसी जोडगोळीला कर्ज देणाºया ३१ बँकांच्या अधिकाºयांना संस्थेकडून चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
नीरव मोदीची फायरस्टर डायमंड दिवाळखोरीत
न्यूयॉर्क : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) घोटाळ्याच्या चौकशीची झळ बसल्याने, नीरव मोदी याची अमेरिकेतील फायरस्टार डायमंड ही कंपनी दिवाळखोरीत गेल्याचे कंपनीच्या वतीने येथील न्यायालयात सांगण्यात आले. मॅनहटन फेडरल दिवाळखोरी न्यायालयात फायरस्टारच्या वकिलांनी मंगळवारच्या सुनावणी दरम्यान सांगितले की, ‘फायरस्टार डायमंड आयएनसी’चा आणि पीएनबी घोटाळ्याचा काहीही संबंध नाही.
तथापि, फायरस्टारच्या पालक कंपनीचे नीरव मोदी हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या व पालक कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम होऊन कंपनीची पुरवठा साखळी पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. फायरस्टारच्या वतीने विंटर्स ज्युरेलर साऊथर्ड अँड स्टिव्हन्स एलएलपी ही विधि संस्था काम पाहात आहे. संस्थेचे वकील आयन विन्टर्स यांनी न्यायालयात बाजू मांडली.
ज्वेलरी परिषदेकडूनही दोघांना समन्स
पीएनबीतील घोटाळ्याबाबत जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने (जीजेईपीसी) नीरव मोदी व मेहुल चोकसी यांना समन्स जारी केले आहे. महिनाभरात उत्तर न पाठविल्यास या दोघांचा हिरे, तसेच दागिने विक्रीचा परवाना रद्द करण्याबाबत कौन्सिल केंद्र सरकारकडे अर्ज करणार आहे. जीजेईपीसी ही केंद्रीय वाणिज्य मंत्रालयांतर्गत कार्य करणारी परिषद असून, जागतिक गोल्ड कौन्सिलसह अन्य संघटनांशी संलग्न आहे.
पीएनबी घोटाळा : सीईओ सुनील मेहता यांचीही तपास कार्यालयामध्ये चौकशी
पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुनील मेहता बुधवारी गंभीर घोटाळा तपास कार्यालयात (एसएफआयओ) जबाब नोेंदविण्यासाठी हजर झाले. पीएनबीमध्ये नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी केलेल्या १२,७00 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना कार्यालयाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:26 AM2018-03-08T01:26:53+5:302018-03-08T01:26:53+5:30