Lokmat Money > बिझनेस न्यूज > PNB Scam : नीरव मोदीचा आणखी एक कोट्यवधींचा महाघोटाळा उघड

PNB Scam : नीरव मोदीचा आणखी एक कोट्यवधींचा महाघोटाळा उघड

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)मधील नीरव मोदी याचा 11, 400 कोटींचा घोटाळ्याची चर्चा सुरु असतानाच आणखी एक महाघोटाळा उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 05:19 PM2018-02-27T17:19:00+5:302018-02-27T17:19:00+5:30

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)मधील नीरव मोदी याचा 11, 400 कोटींचा घोटाळ्याची चर्चा सुरु असतानाच आणखी एक महाघोटाळा उघडकीस

PNB Scam: nirav-modi-mehul-choksi-pnb-scam-additional-fraud | PNB Scam : नीरव मोदीचा आणखी एक कोट्यवधींचा महाघोटाळा उघड

PNB Scam : नीरव मोदीचा आणखी एक कोट्यवधींचा महाघोटाळा उघड

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)मधील नीरव मोदी याचा 11, 400 कोटींचा घोटाळ्याची चर्चा सुरु असतानाच आणखी एक महाघोटाळा उघडकीस आला आहे. काल रात्री पीएनबीने नीरव मोदीचा 1322 कोटी रुपयाचा घोटाळा समोर आणला आहे.  बँकेच्या ओव्हरसीज शाखेला मिळालेल्या नव्या लेटर ऑफ अंडरटेकिंग्जनंतर हा नवा घोटाळा समोर आला. पीएनबीने स्टॉक एक्सचेंजला नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी 1300कोटी रूपयांचा आणखी एक घोटाळा केल्याची माहिती दिली.  यापूर्वी पीएनबीने नीरव मोदीवर 11400 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. 

नीरव मोदीच्या अवैध व्यवहाराचा आकडा 12700 कोटी रूपयांपर्यंत पोहोचला असल्याचे पीएनबीने आपल्या फायलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजला कळवले. अन्य एका फायलिंगमध्ये पीएनबीने या घोटाळ्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची सरकारकडे मागणी केल्याचे फेटाळले आहे.

नीरव मोदीच्या कंपन्यांनी दडवले ५१५ कोटींचे आंतरराष्ट्रीय व्यवहार

नीरव मोदीच्या कंपन्यांनी आयात-निर्यातीशी संबंधित तब्बल ५१५ कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार दडवून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. कर चोरी करून करण्यात आलेले हे व्यवहार आता प्राप्तिकर विभागाकडून तपासले जात आहेत.
तत्पूर्वी, शनिवारी प्राप्तिकर विभागाच्या वतीने नीरव मोदीच्या मुंबईतील एका गोडाऊनमधून १५0 मौल्यवान चित्रे जप्त करण्यात आली. राजा रवी वर्मा आणि जतीन दास यांसारख्या अत्यंत मान्यवर चित्रकारांची चित्रे यात आहेत. त्यांची किंमत काढण्याचे काम आता प्राप्तिकर विभाग करीत आहे.

नीरव मोदी प्रकरणी ईडीची न्यायालयात धाव

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा तपास करणा-या सक्तवसुली संचालनालयाला (ईडी), नीरव मोदीची परदेशातील संपत्ती व व्यवसायाची चौकशी करायची आहे. त्याबद्दल संबंधित देशांकडून माहिती मिळावी, याकरिता ईडीनेड विशेष पीएमएलए न्यायालयाला ‘लेटर आॅफ रोगेटरी’ (एलआर) देण्याची विनंती सोमवारी केली. प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत एलआर काढण्यासाठी ईडीने हा अर्ज केला. हाँगकाँग, यूएसई, युके, यूएई, दक्षिण आफ्रिका आणि सिंगापूर या देशांत नीरव मोदीची संपत्ती आहे. तो या देशांत व्यवसाय करत होता. त्यामुळे या गुुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे संबंधित देशांकडून मिळावी, याकरिता एलआर काढावे, अशी विनंती ईडीने विशेष न्यायालयाला केली. 

 

Web Title: PNB Scam: nirav-modi-mehul-choksi-pnb-scam-additional-fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.