नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) तब्बल 11 हजार कोटींच्या महाघोटाळ्यामुळे काँग्रेस पक्षांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे. घोटाळा करा अन् पळा, मोदी सरकारचा नवा फंडा असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेता रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
रणदीप सुरजेवाला यांनी स्वंत्र्यानंतर सर्वात मोठा घोटाळा असून नियमांना धरुन हा घोटाळा झाला आहे. घोटाळ्याची रक्कम 11 हजार कोटी नाही तर 30 हजार कोटी असण्याची शक्यता आहे. ललित मोदी, विजय माल्या यांच्यानंतर आता नीरव मोदीने महाघोटाळा केला आहे. नीरव मोदी यांनी बँकेच्या घोटाळ्याविषयीची माहिती 26 जुलाई 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली होती.
मोदी सरकारला विचारले हे प्रश्न -
- नीरव मोदी यांच्या पळून जाण्याला कोण जबाबदार आहे?
- नीरव मोदींनी पूर्ण सिस्टमला कसा धोका दिला?
- चार वर्ष चौकशी एजन्सीनं काय केल?
- अर्थमंत्री आणि पंतप्रधान यावर गप्प आहेत आणि समाज कल्याण मंत्री उत्तर देतायत?
‘Loot & Escape” has become the hallmark of Modi Government.#From1MODI2another
— Randeep S Surjewala (@rssurjewala) February 15, 2018
Post-escape of ‘Lalit Modi’ i.e. ‘Chhota Modi’ and ‘Vijay Mallya’, another ‘#ModiScam’ has hit India’s banking sector the hardest.
Our Statement:- pic.twitter.com/idvUxjoOhe
Who is Nirav Modi? The new #ModiScam?
— Randeep S Surjewala (@rssurjewala) February 15, 2018
Was he tipped off like Lalit Modi & Vijay Mallya to escape by someone within the Govt?
Has it become the norm for letting people run away with public money?
Who is responsible?
Pl wait for AICC PC at 2 PM today.
Guide to Looting India
— Office of RG (@OfficeOfRG) February 15, 2018
by Nirav MODI
1. Hug PM Modi
2. Be seen with him in DAVOS
Use that clout to:
A. Steal 12,000Cr
B. Slip out of the country like Mallya, while the Govt looks the other way.
#From1MODI2another
How was the entire system bypassed?
— Randeep S Surjewala (@rssurjewala) February 15, 2018
How did the fraud escape the eyes of all the auditors and investigators? Does it not point to active complicity at the highest level? Who is protecting Nirav Modi/Mehul Choksi? 4/ #From1MODI2another
काय आहे प्रकरण -
सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाला. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत हा घोटाळा झाल्याचे काल उघड झाले. हिरे व्यापारी नीरव मोदीने आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पँजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आज शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले. त्यामुळे पीएनबीने मुंबई शेअर बाजाराला पत्र लिहिलं. घोटाळ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सक्तवसुली संचलनालयाने याप्रकरणी घोटाळ्याचा सुत्रधार आणि प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी याच्या कार्यालयांवर छापेमारी सुरु झाली आहे. नीरव मोदी याच्या मुंबईतसहित तीन शहरांमधील शोरुम आणि कार्यालयांवर छापेमारी झाली आहे .
कोण आहे नीरव मोदी -
नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याला 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. 47 वर्षीय नीरवचे वडील देखील हिरेव्यापारीच होते. नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला. नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.
बँकेचे स्पष्टीकरण -
आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालणार नाही. आम्हाला थोडा वेळ द्या, बँक पूर्ण क्षमतेने दोषींवर कारवाई करत आहे, ग्राहक असो वा कर्मचारी गैरव्यवहार करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करणार असल्याचे आज पंजाब नॅशनल बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं. नवी दिल्ली येथे आज पंजाब नॅशनल बँकचे एमडी सुनिल मेहता यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. 123 वर्षांत पीएनबीने अनेक चढउतार पाहिले आहेत. 2011 मध्ये घोटाळ्याची माहिती मिळाली तेव्हा संबंधित यंत्रणांना माहिती दिली आणि चौकशी सुरु केली होती. बँकेची विश्वासार्हता धोक्यात आणणार नाही त्यामुळं खातेदारांनी निश्चिंत रहावे, प्रत्येक दोषींवर बँक कारवाई करण्यास सक्षम असल्याचे सुनिल मेहता यांनी स्पष्ट केलं.
मल्ल्यापेक्षाही मोठा घोळ
याबाबत सीबीआयच्या सूत्रांनी स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. मात्र आधी २८० कोटी रुपये व आता ११,५०० कोटी रुपये, या दोन्ही घोटाळ्यांची कार्यपद्धती सारखीच आहे. त्यामुळे आता सीबीआयने या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. हा विजय मल्ल्यापेक्षाही मोठा बँक घोटाळा आहे, असे सांगण्यात आले.
तीन बँका संकटात
या घोटाळ्यात संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्जे घेतल्याचे पंजाब नॅशनल बँकेने पत्रात नमूद केले आहे. अन्य बँकांमध्ये अलाहाबाद बँक, युनियन बँक आॅफ इंडिया व खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेचा समावेश असल्याचे बोलले जाते.
सर्वसामान्यांची रक्कम धोक्यात
पीएनबीमध्ये रिझर्व्ह बँक व सर्वसामान्य ठेवीदार यांच्यामार्फत पैसा येतो. समभागधारकांचाही पैसा बँकेत आहे. घोटाळ्याची तक्रार करताना बँकेने ‘संशयास्पद व्यवहार’ असा उल्लेख केला आहे. ही खाती सर्वसामान्य ठेवीदारांची असून घोटाळा केलेल्यांची नावेही बँकेला माहीत नाहीत.