नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यानंतर शेअर मार्केटपासून ते बँकींग सेक्टरमध्ये सर्वांचीच झोप उडाली आहे. या महाघोटाळ्यावर सध्या राजकीय वातारण चांगलेच तापत असून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. त्याबरोबरच बँकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वे असतानाही पीएनबीने 11 हजार कोटींचे कर्ज कसे पास केलं? अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित होत असातानाच आणखी एक माहिती समोर आली आहे. नीरव मोदी यांच्याव्यतिरिक्त आणखी एका उद्योगपतीनं बँकेला चूना लावला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा पीएनबी घोटाळ्यामध्ये कसं अडकलं ? असा प्रश्न उपस्थित होण सहाजिक आहे.
पाच वर्षापूर्वी हिरे व्यापाऱ्याशी संबंध असलेल्या जतिन मेहता याच्या विनसम ग्रुपनेही बँकेमध्ये असा महाघोटाळा केला आहे. त्यावेळी त्याने अशा डजनभर बँकेचे कर्ज चुकवू शकले नव्हते. त्याचा सर्वात मोठा झटका पीएनबीला बसला होता. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या अंडरटेकिंगवर डझनभर बँकेनं विनसमला सात हजार कोटींचे कर्ज दिले होते. यामध्ये पीएनबीनं 1,800 कोटींचे कर्ज दिले होते.
बँकिंग क्षेत्रातील सुत्रानुसार, त्यावेळी बँकांनी कंपनीला लेटर्स ऑफ क्रेडिट इशू दिलं होतं. हे पत्र एसबीएलसी इंटरनेशनल बुलियन बँकेला दिलं होतं. हि तीच बँक आहे जी विनसम ग्रुपनेच्या कंपनींना सोन्याची सप्लाय करत असे. विनसम ग्रुप कर्ज फेडू शकले नाही. त्यानंतर विनसम ग्रुपवर दबाव वाढला असता त्यांनी असे स्पष्ट केलं की, पश्चिम आशियामध्ये नुकसाण झालं आहे. त्यामुळं आम्ही पैसे नाही फेडू शकत. त्यावेळी भारतीय बँकांना मोठा झटका बसला होता. त्याप्रमाणेच आता पुन्हा पाच वर्षानंतर तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता नीरव मोदी यांनी तेच कारण पुढे केलं. नीरव मोदी याने भारतातून पळ काढला आहे. तर विनसम ग्रुपचे कुटुंबीय सिंगापूरमध्ये सध्या स्थाईक आहेत.
कोण आहेत जतिन मेहता....
जतिन मेहता विनसम ग्रुप अँण्ड ज्वॅलेरी लिमिटेडचे मुख्य प्रवर्तक होते.. मेहता यांचा संबंध देशातील मोठ्या उद्योगतींपैकी अडाणी परिवाराशी आहे. जतिन मेहता यांच्यावर सात हजार कोटीं रुपये घेऊन पळ काढल्याचा आरोप आहे. 2012 पासून त्यांचा पत्ता नाही.