Join us

पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरीची संधी, स्पेशालिस्ट ऑफिसरच्या ५३५ पदांसाठी निघाली भरती  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 10:07 AM

PNB SO Recruitment 2020: पंजाब नॅशनल बँकेने विविध विभागांच्या एमएमजीएस-२ आणि एमएमजीएस-३ ग्रेड/स्केलवर मॅनेजर आणि सीनियर मॅनेजरच्या पदांसाठी भरती घोषित केली आहे.

ठळक मुद्देपंजाब नॅशनल बँकेत मॅनेजर आणि सीनियर मॅनेजरच्या पदांसाठी भरती घोषित भरतीप्रक्रिया आज, ८ सप्टेंबरपासून सुरू पीएनबीने ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी २९ सप्टेंबर २०२० ही तारीख निर्धारित केली आहे

नवी दिल्ली - सरकारी बँकांमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांच्या भरतीसाठी तयारी करत असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. पंजाब नॅशनल बँकेने विविध विभागांच्या एमएमजीएस-२ आणि एमएमजीएस-३ ग्रेड/स्केलवर मॅनेजर आणि सीनियर मॅनेजरच्या पदांसाठी भरती घोषित केली आहे. या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठीचे नोटिफिकेशन सोमवारी पीएनबीने pnbindia.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या भरतीप्रक्रियेसाठीची प्रक्रिया आज, ८ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवार पीएनबीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करिअर विभागात उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मच्या मदतीने आपला अर्ज दाखल करू शकतात. पीएनबीने ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी २९ सप्टेंबर २०२० ही तारीख निर्धारित केली आहे.पंजाब नॅशनल बँकेने मॅनेजर आणि सीनिअर मॅनेजरच्या पदांसाठी स्पेशालिस्ट ऑफिसरच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर करिअर विभागात जावे लागेल. तिथे ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर क्लीक करून उमेदवार आयबीपीएसच्या अ‍ॅप्लिकेशन पोर्टलवर जातील. तिथे उमेदवारांना आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर पासवर्डच्या मदतीने लॉगइन करून उमेदवार आपला अर्ज सबमिट करू शकतील.या भरतीप्रक्रियेसाठी एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी या वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये आहे. तर खुल्या प्रवर्गासाठीचे शुल्क ८०० रुपये आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

टॅग्स :नोकरीसरकारी नोकरीपंजाब नॅशनल बँक