नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमचेही या सरकारी बँकेत खाते उघडले असेल, तर आता तुमच्या बँकिंगशी संबंधित सर्व समस्या काही मिनिटांत दूर होतील. बँकेने 3 नंबर जारी केले आहेत, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही अनेक गोष्टी करू शकता.
बँकेने आपल्या अधिकृत ट्विटरवर यासंदर्भात माहिती ट्विट केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटरवर म्हटले आहे की, जेव्हाही तुम्हाला शंका असेल तेव्हा तुम्ही आमच्या कस्टमर केअर सपोर्टसोबत संपर्क साधू शकता. येथे तुम्हाला सर्व समस्यांचे निराकरण मिळेल.
'हे' नंबर्स सेव्ह करापंजाब नॅशनल बँकेने ट्विट करून कस्टमर केअर नंबर्स जारी केले आहेत. कोणत्याही समस्येसाठी तुम्ही 1800-103-2222, 1800-180-2222, 0120-249-0000 नंबर्सवर संपर्क साधू शकता.
या नंबरवर तुम्हाला कोणत्या सुविधा मिळू शकतात?- खात्यातील बॅलन्स आणि इंक्वॉअरी- शेवटचे 5 ट्रान्जेक्शन- इश्यू/ब्लॉक आणि इतर डेबिट कार्ड संबंधित विनंत्या- इनेबल आणि डिसेबल ग्रीन कार्ड- चेकबुक स्थिती चेक करू शकता- डेबिट कार्ड ट्रान्जेक्शन लिमिटबद्दल अपडेट- ई-स्टेटमेंटसाठी रजिस्ट्रेशन करू शकता- UPI/IBS/MBS ब्लॉक करू शकता- चेकचे पेमेंट थांबवण्यासाठी- मोफत खाते