नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या (Pubjab National Bank) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या व्याजदरात 1 सप्टेंबरपासून बदल करण्यात येणार आहे.
दरम्यान, पंजाब नॅशनल बँक पुढील महिन्यापासून बचत खात्यामध्ये जमा रकमेवर कपात करणार आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचे नवीन व्याजदर 2.90 टक्के वार्षिक असणार आहेत, सध्या बँक बचत खात्यावरील रकमेवर 3 टक्के दराने व्याज देते.
नवीन आणि जुन्या ग्राहकांवर होणार परिणाम
पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन व्याजदर सध्याच्या आणि नव्या ग्राहकांना (Old and New Customers of PNB) लागू होतील. पंजाब नॅशनल बँक ही देशातील दुसरी मोठी सरकारी बँक आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) ग्राहकांना बचत खात्यावर वार्षिक 2.70 टक्के दराने व्याज मिळते. तर, कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आणि इंड्सइंड बँक (IndusInd Bank) बचत खात्यावर वार्षिक 4 ते 6 टक्के व्याजदर आहे.
बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ऑगस्टपासून पगारात वाढ; जाणून घ्या, महागाई भत्ता किती वाढवला? https://t.co/2d3dBPrta2#bank
— Lokmat (@MiLOKMAT) August 11, 2021
पंजाब नॅशनल बँकेमध्ये यूनायटेड आणि ओरिएंटल बँकेचे विलिनीकरण
पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (oriental bank of commerce) आणि यूनायटेड बँक ऑफ इंडिया (United bank of India) चे विलिनीकरण झाले आहे. गेल्यावर्षी या दोन्ही बँकांचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण झाले होते. आता या दोन्ही बँकांच्या शाखा पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेच्या स्वरुपात काम करतात.