Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएनबी लवकरच ठरणार थकबाकीदार!

पीएनबी लवकरच ठरणार थकबाकीदार!

पीएनबीच्या लेटर्स आॅफ अंडरटेकिंगवर (एलओयू) युनियन बँकेने दिलेल्या १ हजार कोटींच्या कर्जाची परतफेड मुदत ३१ मार्चला संपत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 03:52 AM2018-03-27T03:52:32+5:302018-03-27T03:52:32+5:30

पीएनबीच्या लेटर्स आॅफ अंडरटेकिंगवर (एलओयू) युनियन बँकेने दिलेल्या १ हजार कोटींच्या कर्जाची परतफेड मुदत ३१ मार्चला संपत आहे.

PNB will soon be the defaulting! | पीएनबी लवकरच ठरणार थकबाकीदार!

पीएनबी लवकरच ठरणार थकबाकीदार!

नवी दिल्ली : पीएनबीच्या लेटर्स आॅफ अंडरटेकिंगवर (एलओयू) युनियन बँकेने दिलेल्या १ हजार कोटींच्या कर्जाची परतफेड मुदत ३१ मार्चला संपत आहे. हे पैसे अदा न केल्यास युनियन बँक पीएनबीला थकबाकीदार घोषित करू शकते. तसेच ही रक्कम अनुत्पादक भांडवलात (एनपीए) टाकली जाऊ शकते.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातून हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. दोन्ही बँका सरकारी मालकीच्या आहेत. रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप न केल्यास एका बँकेने दुसऱ्या बँकेला थकबाकीदार ठरवण्याची पहिली घटना भारतीय बँकिंग इतिहासात घडू शकते.
एका वरिष्ठ बँक अधिकाºयाने सांगितले की, भारतीय बँकिंग इतिहासात आजपर्यंत कोणतीही बँक थकबाकीदारांच्या यादीत ढकलली गेलेली नाही. नव्या नियमांनुसार थकबाकीच्या रकमेची तरतूद बँकांना लगेच करावी लागते. तसेच थकलेले कर्ज एनपीएमध्ये टाकावे लागते.
युनियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजकिरण राय म्हणाले की, आमच्या वहीखात्यात कोणताही घोटाळा नाही. पीएनबीच्या हमीपत्रावर आम्ही पैसे अदा केले. नियमानुसार पीएनबीने ते आम्हाला द्यायला हवे. पीएनबीला थकबाकीदार घोषित करण्याची आमची इच्छा नाही. यातून तोडगा निघावा यासाठी सरकार वा रिझर्व्ह बँकेकडून हस्तक्षेप केला जाईल, अशी आमची अपेक्षा आहे.
३१ मार्चपूर्वी परिपक्व होणारे एलओयू वित्त वर्षातच एनपीएमध्ये टाकावे, असा आग्रह लेखापरीक्षक धरू शकतात. एलओयूंसाठी पीएनबीशी समझोता करावा, असा सल्ला काही लेखापरीक्षक देऊ शकतात.

१३ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड कंपनीच्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेत भाग घेण्याचा विचार पीएनबी करीत आहे.
आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी कंपनीच्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेत भाग घेण्यासह सगळे पर्याय बँक शोधत आहे, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, बँक कायदातज्ज्ञांची सेवा घेण्याच्या प्रक्रियेत आहे, लवकरच ही सेवा घेतली जाईल.
कर्जवसुली करताना कुठेही उणिवा राहू नयेत यासाठी उलटसुलट बाजूंचा अभ्यास केला जात आहे. याबाबत पीएनबीने मात्र कोणतेही भाष्य केलेले नाही.

Web Title: PNB will soon be the defaulting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.