नवी दिल्ली: तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला परवडणाऱ्या दरात कर्ज घेण्याची उत्तम संधी चालून आली आहे. पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) स्वातंत्र्यदिनी गृहकर्जाच्या ऑफर अंतर्गत नवीन ऑफर आणली आहे. येत्या 30 सप्टेंबर पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल.
Get freedom from processing fee & documentation charges with our Independence Day Home Loan offer.
— Punjab National Bank (@pnbindia) August 18, 2021
What else could you ask for?#Homeloan#offers#2021goalspic.twitter.com/Rm3LKRosd6
पीएनबीच्या स्वातंत्र्यदिनाच्या गृहकर्जाच्या ऑफरअंतर्गत, बँक ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचा प्रक्रिया शुल्क आकारणार नाही. म्हणजेच गृहकर्ज कोणत्याही प्रक्रिया शुल्क आणि डॉक्युमेंटेशन चार्जशिवाय उपलब्ध असेल. या नवीन ऑफर अंतर्गत पीएनबी ग्राहकांना 6.80 टक्के दराने गृहकर्ज देणार आहे. म्हणजेच PNB कडून गृहकर्ज घेणाऱ्यांना कमी दरात गृहकर्ज मिळेल, तसेच दोन्ही शुल्कही माफ केले जातील. पीएनबीनं ट्विट करुन या ऑफरची माहिती दिली.
पीएनबी गोल्ड मॉनीटायजेशनवर ऑफर
गृहकर्जासह पीएनबी सोन्यातून कमाईची संधीदेखील देत आहे. आपल्याकडे पडून अललेल्या सोन्याच्या मदतीने गोल्ड मॉनीटायजेशन योजनेअंतर्गत किमान 10 ग्रॅम सोनं जमा करता येईल. यासाठी बँक तीन पर्याय देत आहे. अल्प मुदतीच्या ठेवी 1-3 वर्षांच्या असतील, मध्यम मुदतीच्या ठेवी 5-7 वर्षांच्या असतील आणि दीर्घ मुदतीच्या ठेवी 12-15 वर्षांच्या असतील. अल्प मुदतीच्या ठेवींमध्ये, 1 वर्षासाठी 0.50 टक्के, 1-2 वर्षांसाठी 0.60 टक्के आणि 2-3 वर्षांसाठी 0.75 टक्के व्याज उपलब्ध असेल. मध्यम मुदत ठेवींसाठी व्याज दर 2.25%, तर दीर्घ मुदतीच्या ठेवींसाठी हा व्याज दर 2.50 टक्के आहे.