Lokmat Money > बिझनेस न्यूज > P&O Ferries : अवघ्या 3 मिनिटांच्या झूम कॉलवर 800 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; 'या' कंपनीची धक्कादायक घोषणा

P&O Ferries : अवघ्या 3 मिनिटांच्या झूम कॉलवर 800 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; 'या' कंपनीची धक्कादायक घोषणा

P&O Ferries sacks 800 employees : शिपिंग कंपनी पीअँडओ फेरीजने (P&O Ferries) झूम कॉलवर आपल्या 800 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 10:49 AM2022-03-19T10:49:38+5:302022-03-19T10:56:16+5:30

P&O Ferries sacks 800 employees : शिपिंग कंपनी पीअँडओ फेरीजने (P&O Ferries) झूम कॉलवर आपल्या 800 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली.

P&O Ferries sacks 800 employees over a zoom call as better ceo vishal garg | P&O Ferries : अवघ्या 3 मिनिटांच्या झूम कॉलवर 800 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; 'या' कंपनीची धक्कादायक घोषणा

P&O Ferries : अवघ्या 3 मिनिटांच्या झूम कॉलवर 800 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; 'या' कंपनीची धक्कादायक घोषणा

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपूर्वी झूम कॉल (Zoom call) दरम्यान अमेरिका स्थित  Better.com कंपनीच्या सीईओ (CEO) विशाल गर्ग यांनी तब्बल 900 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्याचे वृत्त समोर आले होते. आता आणखी एका कंपनीने असेच केले आहे. ही कंपनी ब्रिटनमधील आहे. शिपिंग कंपनी पीअँडओ फेरीजने (P&O Ferries) झूम कॉलवर आपल्या 800 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली.

17 मार्च रोजी झूम कॉल दरम्यान शिपिंग कंपनीने आपल्या 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. भीती निर्माण करणारा झूम कॉल केवळ 3 मिनिटे चालला आणि कर्मचार्‍यांना नोटीस पीरियड देण्याची संधी देखील देण्यात आली नाही. या निर्णयाला ब्रिटिश राजकारण्यांनी धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटनच्या कंपनीला कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान ब्रिटन सरकारकडून 1 कोटी पौंड कॅश मिळाली होती. ज्यामधून कंपनीला आपल्या 1,100 कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागले. कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना सांगितले की, गेल्या दोन वर्षात 20 कोटी पौंडचे नुकसान झाले आहे आणि आता कंपनीच्यासमोर निधीच्या गैरव्यवस्थापनामुळे संपूर्ण सुट्टीत मिळालेले पेआउट परत करण्याचा धोका आहे.

डेलीमेलच्या वृत्तानुसार, पीअँडओ फेरीजचे प्रमुख त्यांच्या झूम कॉल दरम्यान म्हणाले, "तुम्हाला ताबडतोब कामावरून काढून टाकण्यात येत आहे, हे सांगताना मला दु:ख होत आहे."

कंपनीला निधी परत करावा लागू शकतो
यूकेचे खासदार कार्ल टर्नर म्हणाले, "ते पूर्ण पैसे परत केले पाहिजेत. ब्रिटीश करदात्यांनी या कंपनीला जे काही पैसे दिले होते, ते परत केले पाहिजेत आणि सरकारने कंपनीला युनियन्सशी वाटाघाटी करून करार करण्यास सांगितले पाहिजे."

आधीही झूमवरच्या कॉलने 900 जणांची नोकरी गेली होती 
दरम्यान, गेल्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात Better.com चे सीईओ विशाल गर्ग यांनी झूम कॉल दरम्यान अमेरिकेत आणि भारतातील त्यांच्या 900 कर्मचाऱ्यांना एका क्षणात काढून टाकले. Better.com ही  अमेरिकेतील एक डिजिटल फर्स्ट होम ओनरशिप कंपनी आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, कंपनीचे भारतीय-अमेरिकन सीईओ गर्ग यांनी झूम वेबिनारवर 900 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. सीईओ गर्ग यांनी सांगितले की, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वेबिनारच्या माध्यमातून कामावरून काढले जात आहे.
 

Web Title: P&O Ferries sacks 800 employees over a zoom call as better ceo vishal garg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.