Join us

25 हजार रुपये गुंतवून 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल लाखोंची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 1:55 PM

हा असा व्यवसाय आहे, ज्याला दर महिन्याला मार्केटमध्ये प्रचंड मागणी असते.

नवी दिल्ली : जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला एका व्यवसायबद्दल माहिती देत आहोत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप कमी पैसे खर्च करावे लागतील. हा असा व्यवसाय आहे, ज्याला दर महिन्याला मार्केटमध्ये प्रचंड मागणी असते. त्याशिवाय लोकांचा सकाळचा नाश्ता अपूर्ण राहतो. पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट (Poha Manufacturing Unit) उभारून तुम्ही दरमहा लाखो रुपये सहज कमवू शकता. 

पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी सुमारे 2.43 लाख रुपये खर्च येतो. तुमच्याकडे पैसे नसल्यास तुम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकता. यामध्ये तुम्ही 90 टक्के कर्ज सहज घेऊ शकता. दरम्यान, पोहे हे पौष्टिक अन्न मानले जाते. हे बनवायला आणि पचायला दोन्ही सोपे आहे. त्यामुळेच पोह्यांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. हिवाळा असो किंवा उन्हाळा, लोक दर महिन्याला ते मोठ्या आवडीने (चवीने) खातात. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. अशा परिस्थितीत पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारून तुम्ही फायदेशीर व्यवसाय  (Profitable Business) उभारू शकता.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (Khadi and Village Industries Commission/KVIC) प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिटची किंमत जवळपास 2.43 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. अशा परिस्थितीत पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे 25,000 रुपयांची व्यवस्था करावी लागेल. ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी KVIC कडून दरवर्षी कर्ज दिले जाते. तुम्हीही याचा लाभ घेऊ शकता.

'हे' साहित्य लागेल...हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 500 चौरस फूट जागा आवश्यक आहे. पोहे मशीन, भट्टी, पॅकिंग मशीन आणि ड्रमसह लहान वस्तू आवश्यक असतील. KVIC च्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, या व्यवसायाच्या सुरुवातीला काही कच्चा माल आणा, नंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. अशा प्रकारे, तुम्हाला चांगला अनुभव मिळेल तसेच व्यवसाय देखील वाढेल. तसेच,जर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि ग्रामोद्योग रोजगार योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला जवळपास 90 टक्के कर्ज मिळू शकते, असे  KVIC च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

किती होईल कमाई?प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर कच्चा माल घ्यावा लागतो. यासाठी जवळपास 6 लाख रुपये खर्च येईल. याशिवाय 50,000 रुपये इतरत्र खर्च केले जातील. अशा प्रकारे सुमारे 1000 क्विंटल पोह्याचे उत्पादन होईल. ज्यावर उत्पादन खर्च 8.60 लाख रुपये येईल. तुम्ही 1000 क्विंटल पोहे जवळपास 10 लाख रुपयांना विकू शकता. म्हणजेच तुम्ही जवळपास 1.40 लाख रुपये कमवू शकता.

टॅग्स :व्यवसायपैसा