Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोलिसांचा दंडही ‘पेटीएम’ने भरा!

पोलिसांचा दंडही ‘पेटीएम’ने भरा!

वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लावण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस आता ई-चलानचा वापर करणार आहेत.

By admin | Published: April 5, 2017 04:25 AM2017-04-05T04:25:43+5:302017-04-05T04:25:43+5:30

वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लावण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस आता ई-चलानचा वापर करणार आहेत.

Police is punished by 'Patyam' | पोलिसांचा दंडही ‘पेटीएम’ने भरा!

पोलिसांचा दंडही ‘पेटीएम’ने भरा!


मुंबई : वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लावण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस आता ई-चलानचा वापर करणार आहेत. काही ठिकाणी याचा प्रयोग सुरू झाला आहे. ई-चलानद्वारे दंड लवकरच ‘पेटीएम’ या ई-वॉलेटद्वारे क्युआर कोड स्कॅन करून भरण्याची सोय उपलब्ध होईल. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केल्याचे ‘पेटीएम’च्या पश्चिम भारत विभागाचे प्रमुख रिपुंजाई गौर यांनी येथे सांगितले.
वीज देयके व काही ठिकाणी मालमत्ता करही सध्या ‘पेटीएम’द्वारे भरता येत आहे. हा कर भरण्यासाठी छापील देयकावरच क्युआर कोड छापण्याची आणि त्याद्वारे तत्काळ भरणा करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्यासाठी राज्यातील अनेक महापालिकांशी बोलणी सुरू आहेत. गुडगाव पालिकेत हा प्रयोग यशस्वीही झाला आहे, असेही गौर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Police is punished by 'Patyam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.