Join us  

पोलिसांचा दंडही ‘पेटीएम’ने भरा!

By admin | Published: April 05, 2017 4:25 AM

वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लावण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस आता ई-चलानचा वापर करणार आहेत.

मुंबई : वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लावण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस आता ई-चलानचा वापर करणार आहेत. काही ठिकाणी याचा प्रयोग सुरू झाला आहे. ई-चलानद्वारे दंड लवकरच ‘पेटीएम’ या ई-वॉलेटद्वारे क्युआर कोड स्कॅन करून भरण्याची सोय उपलब्ध होईल. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केल्याचे ‘पेटीएम’च्या पश्चिम भारत विभागाचे प्रमुख रिपुंजाई गौर यांनी येथे सांगितले. वीज देयके व काही ठिकाणी मालमत्ता करही सध्या ‘पेटीएम’द्वारे भरता येत आहे. हा कर भरण्यासाठी छापील देयकावरच क्युआर कोड छापण्याची आणि त्याद्वारे तत्काळ भरणा करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील अनेक महापालिकांशी बोलणी सुरू आहेत. गुडगाव पालिकेत हा प्रयोग यशस्वीही झाला आहे, असेही गौर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)