Lokmat Money > बिझनेस न्यूज > पिकाची धसकटे जाळल्याने प्रदूषण; वर्षाला ३0 अब्ज डॉलरचा फटका

पिकाची धसकटे जाळल्याने प्रदूषण; वर्षाला ३0 अब्ज डॉलरचा फटका

पीक काढल्यानंतर शिल्लक राहिलेली धसकटे जाळल्यामुळे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:15 AM2019-03-05T04:15:52+5:302019-03-05T04:16:00+5:30

पीक काढल्यानंतर शिल्लक राहिलेली धसकटे जाळल्यामुळे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होते.

 Pollution due to burns of crop; $ 30 billion hit by the year | पिकाची धसकटे जाळल्याने प्रदूषण; वर्षाला ३0 अब्ज डॉलरचा फटका

पिकाची धसकटे जाळल्याने प्रदूषण; वर्षाला ३0 अब्ज डॉलरचा फटका

नवी दिल्ली : पीक काढल्यानंतर शिल्लक राहिलेली धसकटे जाळल्यामुळे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होते. त्यातून श्वसनाशी संंबंधित विविध आजार उद्भवून अर्थव्यवस्थेला वार्षिक ३0 अब्ज डॉलरचा फटका बसतो.
अमेरिकास्थित इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट (आयएफपीआरआय) या संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. संस्थेने जारी केलेल्या निष्कर्षानुसार, धसकटे जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे तीव्र स्वरूपाचा श्वसन मार्ग संसर्ग होतो. पाच वर्षांखालील मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक दिसून येते.
आरोग्य आणि आर्थिक आघाडीवर त्यामुळे दरवर्षी ३0 अब्ज डॉलरचा म्हणजेच सुमारे २ लाख कोटी रुपयांचा फटका बसतो.
आयएफपीआरआयचे संशोधक सॅम्युएल स्कॉट यांनी सांगितले की, धसकटे जाळण्याच्या काळात दिल्लीच्या हवेतील सूक्ष्म कणांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या सुरक्षित प्रमाणापेक्षा २0 पट जास्त असते. पंजाब आणि हरियाणा या राज्यांत धसकटे जाळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. शेजारच्या दिल्लीला त्याचा फटका बसतो. या अभ्यासात ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व वयोगटांतील २,५0,000 व्यक्तींचा आरोग्यविषयक डाटा तपासण्यात आला आहे.
धसकटे जाळण्याच्या हंगामात या भागातील शेतावरील आग इतकी भीषण असते की, नासाच्या पग्रहातही तिची नोंद होते.
>जीडीपीचे १.७ टक्के नुकसान
श्वसन मार्गाशी संबंधित आजारांस शेतावरील जळिताच्या घटनांप्रमाणेच दिवाळीत फोडले जाणारे फटाकेही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. फटाक्यांमुळे होणारे आर्थिक नुकसान ७ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ५0 हजार कोटी रुपये आहे. मागील तीन वर्षांत धसकटे जाळणे आणि फटाके, यामुळे अर्थव्यवस्थेला १९0 अब्ज डॉलरचा फटका बसला. हे नुकसान जीडीपीच्या १.७ टक्के आहे.

Web Title:  Pollution due to burns of crop; $ 30 billion hit by the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.