Lokmat Money > बिझनेस न्यूज > २०११ मधील दारिद्र्यरेषेचे सर्वेक्षण होणार कायम- पंकजा

२०११ मधील दारिद्र्यरेषेचे सर्वेक्षण होणार कायम- पंकजा

राज्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांना घरकूल योजनेचा लाभ देता यावा, याकरिता सन २०११ मधील दारिद्र्यरेषेचे (बीपीएल) सर्वेक्षण लागू करण्यात येईल

By admin | Published: January 11, 2016 03:04 AM2016-01-11T03:04:19+5:302016-01-11T03:04:19+5:30

राज्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांना घरकूल योजनेचा लाभ देता यावा, याकरिता सन २०११ मधील दारिद्र्यरेषेचे (बीपीएल) सर्वेक्षण लागू करण्यात येईल

Poor's will be surveyed in 2011: Pankaja | २०११ मधील दारिद्र्यरेषेचे सर्वेक्षण होणार कायम- पंकजा

२०११ मधील दारिद्र्यरेषेचे सर्वेक्षण होणार कायम- पंकजा

अमरावती : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांना घरकूल योजनेचा लाभ देता यावा, याकरिता सन २०११ मधील दारिद्र्यरेषेचे (बीपीएल) सर्वेक्षण लागू करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी दिली. अमरावती येथे ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान व पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना प्रचार व प्रसिध्दी अंतर्गत सायन्सस्कोर मैदानावर १० ते १४ जानेवारीपर्यंत आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी त्या शहरात आल्या असता आयोजित पत्रपरिषदेत बोलत होत्या.
मुंडे म्हणाल्या, या निर्णयामुळे राज्यातील सुमारे चार लाख लोकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यापेक्षा कर्जमुक्तीवर शासनाचा अधिक भर आहे. राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उत्कृष्ट कामे झाली आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन करून नैराश्यग्रस्त सदस्यांचे समुपदेशन करून त्यांना धीर देण्यात येईल.

Web Title: Poor's will be surveyed in 2011: Pankaja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.