नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतीत दिवाळीच्या तोंडावर काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती पडल्यानंतर त्याचा लाभ ग्राहकांना देण्याची तयारी सार्वजनिक तेल वितरक कंपन्यांनी केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा आठवडाभरात आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर शक्य तेवढी दरकपात केली जाऊ शकते, असे कंपन्यांच्या सूत्रांनी सांगितले. पेट्रोलच्या किमती ४३ दिवसांपासून स्थिर आहेत. तर, डिझेलच्या किमतीमध्ये २ ऑक्टोबर-पासून बदल झालेला नाही.भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाचे दर सप्टेंबरमध्ये सरासरी ४१ डॉलर्स प्रतिबॅरेल होते. त्यात ऑक्टोबरमध्ये त्यात थोडी घट झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने तेलाची मागणी घटली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्यात आणखी घसरण झाली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांकडून दरकपातीची शक्यता आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरकपातीची शक्यता, दिवाळीच्या तोंडावर काहीसा दिलासा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2020 2:00 AM