- मनोज गडनीस, मुंबई
हॉटेल, शॉपिंगसाठी गेल्यावर अथवा होम डिलिव्हरी मागविल्यावर बिलाचे पैसे देण्यासाठी सोबत डेबिट अथवा क्रेडिट कार्ड बाळगण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्याच्या साहाय्याने संबंधित दुकानाचा ‘क्यूआर’ (क्विक रिस्पॉन्स कोड-बारकोड) स्कॅन करावा लागणार आहे व तो स्कॅन झाल्यावर बिलाची संबंधित रक्कम टाकली की तो व्यवहार पूर्ण होणार आहे. हे तंत्रज्ञान विकसित झाले असून दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक बँकांतर्फे ही सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.
या तंत्राचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक वेळी तुम्हाला खिशात तुमचे क्रेडिट अथवा डेबिट कार्ड बाळगणे गरजेचे नाही. लवकरच बँकांच्या अॅपवर याची सुविधा उपलब्ध असेल. ज्यांच्या फोनमध्ये हे अॅप आहे, अशा लोकांना केवळ साईनिंग करून या सेवेचा लाभ घेता येईल. तर, जे लोक नव्याने अॅप डाऊनलोड करतील, त्यांना अपडेटेड स्वरूपात या सुविधेसह हे अॅप मिळेल. एकदा या अॅपवर साईनिंग केले की, तुमच्या फोनचा कॅमेरा त्या दृष्टीने सज्ज असेल. एखाद्या दुकानात तुम्ही गेल्यावर काही खरेदी केली की, त्या दुकानदाराचा जो बारकोड आहे, तो बारकोड फक्त फोनमधील कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्कॅन करावा लागेल. स्कॅनिंग झाले की, तुम्हाला तुमच्या व्यवहाराची रक्कम विचारली जाईल. ती रक्कम टाकली व ‘ओके’च्या बटणावर क्लिक केले की तो व्यवहार पूर्ण होईल व तसा मेसेजही ग्राहकाला येईल. ज्या उत्पादनांची होम डिलिव्हरी शक्य आहे, अशा उत्पादनांसाठीदेखील ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, या ‘क्यूआर’ कोडला डिलिव्हरी करणाऱ्या मुलाच्या फोनमध्ये बसविण्यात येईल. होम डिलिव्हरी करायला आलेल्या व्यक्तीच्या फोनमधील तो ‘क्यूआर’ कोड स्कॅन करून रक्कम टाकली की व्यवहार पूर्ण होईल.
या सेवेचा प्रमुख फायदा म्हणजे, ग्राहकाला कार्ड सोबत बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. आजच्या घडीला अनेक दुकानांतून पॉइंट आॅफ सेलमशीन सोबतच दुकानदार स्वत:च्या कॉम्प्युटरमध्ये देखील कार्ड स्वाईप करून ग्राहकाची माहिती प्राप्त करून घेतात. या नव्या तंत्रामुळे कार्डाचा वापरच होणार नसल्याने अतिरिक्त माहितीदेखील देण्याची गरज भासणार नाही.
क्विक रिस्पॉन्स कोडचे तंत्र विकसित
वेबसाईट आणि स्मार्टफोनवरून वापरले जाणारे अॅप तयार झाल्यानंतर, संबंधित वेबसाईट उघडण्यासाठी अथवा अॅपची लिंक मिळविण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जायची गरज आता भासत नाही.
ती सुविधा केवळ फोनमधील कॅमेऱ्यातून केलेल्या स्कॅनिंगच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी, याकरिता क्विक रिस्पॉन्स कोडचे तंत्र विकसित झाले.
तंत्रज्ञानाचा उपयोग
आजवर हे तंत्र केवळ दुकानांतून एखाद्या उत्पादनाची माहिती व संबंधित दुकानात त्याचा उपलब्ध असलेला स्टॉक याकरिता वापरले जात असे; पण या तंत्रज्ञानाची मांडणी अधिक अभिनव पद्धतीने करत आता आर्थिक व्यवहारांच्या पूर्ततेसाठी करण्यात आली आहे.
कार्डांविना आर्थिक व्यवहार शक्य
हॉटेल, शॉपिंगसाठी गेल्यावर अथवा होम डिलिव्हरी मागविल्यावर बिलाचे पैसे देण्यासाठी सोबत डेबिट अथवा क्रेडिट कार्ड बाळगण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या स्मार्टफोनमधील
By admin | Published: October 21, 2015 04:17 AM2015-10-21T04:17:49+5:302015-10-21T04:17:49+5:30