नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने रेल्वेसेवेमध्ये ब्रिटिश काळापासून सुरू असलेले खलाशी पद रद्द केले आहे. अनेक वर्षांपासून असलेल्या या पदासाठी आता कुठल्याही प्रकारची भरती होणार नाही. तसेच १ जुलै २०२० नंतर या पदावर झालेल्या नियुक्त्यांची समीक्षा करण्यात येणार आहे.
रेल्वेमधील खलाशी या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम हे ब्रिटिशकाळात रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या घरी तैनात असलेल्या नोकराप्रमाणे असे. दरम्यान, रेल्वेकडून सहा अॉगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार रेल्वेतील खलाशांच्या पदांची समीक्षा करण्यात येत असून, आता या पदांवर कुठलीही नवीन भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिकृत माहितीनुसार रेल्वे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या बंगला प्युन किंवा खलाशांच्या नियुक्तीची ब्रिटिशकालीन प्रथा संपुष्टात आणण्याची तयारी करत आहे. आता या पदासाठी नव्याने भरती होणार नाही. रेल्वे बोर्डाने आदेशात सांगितले की, टेलिफोन अटेंडेंट आणि डाक खलाशी संबंधीची समीक्षा सुरू आहे. त्यामुळेच टीएडीके म्हणून नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पुढे वाढवण्यात येऊ नये, तसेच तत्काळ नियुक्त्याही करण्यात येऊ नयेत.
याशिवाय १ जुलैपासून झालेल्या अशा नियुक्त्यांची समीक्षा करण्यात येऊ शकते. तसेच याची स्थिती बोर्डाला सांगण्यात येईल. दरम्यान, या सूचनेचे रेल्वेशी संबंधित सर्व संस्थांनी सक्तपणे पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल