Post Office Bal Jeevan Bima Yojana: गेल्या अनेक दशकांपासून Post Office हे भारतीयांचे अढळ विश्वासाचे स्थान आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आताच्या घडीला उपलब्ध असून, कोट्यवधी देशवासी नानाविध योजनांचा लाभ घेत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते. Post Office अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. Post Office मध्ये तुमचे पैसेही सुरक्षित राहतात, यासोबतच तुम्हाला हमखास परतावाही मिळतो. यातच आता पोस्ट ऑफिसने लहान मुलांसाठी एक वीमा योजना आणली असून, कमी गुंतवणुकीत जास्त परतावा मिळू शकतो.
आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित असावे, असे सर्वच पालकांना वाटत असते. आताच्या घडीला देशात अनेक योजना उपलब्ध आहेत. मात्र, लहान मुलांसाठी देशातील विश्वासार्ह असलेल्या पोस्ट ऑफिने एक पॉलिसी आणली आहे. यामध्ये गुंतवणूक करून मुलांचे भविष्य तर सुरक्षित होतेच, तसेच पालकांना चांगला परतावा मिळतो, ज्याच्या मदतीने ते मुलांचे शिक्षण, लग्न यांसारखे मोठे खर्च सहज भागवू शकतात. तुम्ही छोटीशी गुंतवणूक करून तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव बाल जीवन विमा असे आहे.
बाल जीवन विमा घेण्यासाठी वयोमर्यादा काय?
पोस्ट ऑफिसची बाल जीवन विमा योजना पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत येते. या योजनेंतर्गत ५ ते २० वर्षांपर्यंतच्या मुलांचा जीवन विमा करता येतो. कोणताही पालक जास्तीत जास्त दोन मुलांसाठी हा विमा घेऊ शकतो. योजना घेताना पालकांचे कमाल वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे. ही पॉलिसी घेताना कोणतीही वैद्यकीय तपासणी केली जात नाही. पॉलिसी स्वीकारल्यापासून मुलाला संरक्षण मिळण्यास सुरुवात होते. पॉलिसी घेतल्यानंतर पालकाचा मृत्यू झाल्यास प्रीमियम भरावा लागणार नाही. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर विमा रकमेसह बोनसची रक्कम दिली जाते.
फक्त ६ रुपयांची गुंवतणूक करा अन् १ लाख रुपयांचा परतावा मिळवा
बाल जीवन विमा योजनेंतर्गत, मुलांसाठी प्रतिदिन ६ रुपये ते १८ रुपयांपर्यंतचा प्रीमियम जमा करू शकता. जर एखाद्या पॉलिसीधारकाने ही पॉलिसी ५ वर्षांसाठी खरेदी केली तर त्याला दररोज ६ रुपये प्रीमियम भरावा लागेल. परंतु ही पॉलिसी २० वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी केली असल्यास, १८ रुपये दैनिक प्रीमियम भरावा लागेल. या योजनेत तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरावा लागेल. या पॉलिसीच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर १ लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते.
विमा संरक्षण किती आणि काय फायदा होऊ शकेल?
पोस्ट ऑफिसच्या बाल जीवन विमा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त तीन लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम पेमेंटचा पर्याय निवडू शकता. बाल जीवन विम्यामध्ये १००० रुपयांच्या विमा रकमेवर प्रति वर्ष ५२ रुपये बोनस दिला जातो. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बाल जीवन विमा मिळवू शकता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"