Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office ची बेस्ट स्कीम! तुम्हाला फक्त व्याजातूनच मिळतील 2 लाख रुपये; कसं आहे गणित?

Post Office ची बेस्ट स्कीम! तुम्हाला फक्त व्याजातूनच मिळतील 2 लाख रुपये; कसं आहे गणित?

Post Office Time Deposit Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेतील गुंतवणुकीवर सरकारकडून ७.५ टक्के इतके आकर्षक व्याज दिले जात आहे. यातून तुम्ही फक्त व्याजावरच श्रीमंत होऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 11:18 AM2024-09-22T11:18:56+5:302024-09-22T11:22:42+5:30

Post Office Time Deposit Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेतील गुंतवणुकीवर सरकारकडून ७.५ टक्के इतके आकर्षक व्याज दिले जात आहे. यातून तुम्ही फक्त व्याजावरच श्रीमंत होऊ शकता.

post office best scheme invest in time deposit and get more than 2 lakh rupees only by interest | Post Office ची बेस्ट स्कीम! तुम्हाला फक्त व्याजातूनच मिळतील 2 लाख रुपये; कसं आहे गणित?

Post Office ची बेस्ट स्कीम! तुम्हाला फक्त व्याजातूनच मिळतील 2 लाख रुपये; कसं आहे गणित?

Post Office Time Deposit Scheme : सध्या बाजारात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहे. मात्र, यातील अनेक पर्यायांमध्ये मोठी जोखीम आहे. अशात प्रत्येकजण सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असतो. तुम्हीही अशा एखाद्या योजनेबद्दल सर्च सरत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहचला आहात. या संदर्भात, पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक योजना खूप लोकप्रिय होत आहेत. यामध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक करूनही तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता. अशीच एक बजेट योजना पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना आहे. या योजनेत सरकारकडून चांगला व्याजदर दिला जातो.

या योजनेत ७.५% उत्कृष्ट व्याज
पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयोगटासाठी, लहान मुले, वृद्ध, तरुण आणि महिलांसाठी बचत योजना चालवल्या जातात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेबद्दल सांगायचं झालं तर चांगला परतावा, सुरक्षित गुंतवणूक आणि कर सवलत. आता तुम्ही म्हणाल आणखी काय पाहिजे? या योजनेत ५ वर्षांसाठी पैसे गुंतवले जातात. या कालावधीतील तुमच्या गुंतवणुकीवर सरकारकडून ७.५ टक्के आकर्षक व्याज दिले जाते. म्हणजे परतावा देण्याच्या बाबतीतही ही योजना सरस ठरत आहे.   

वेगवेगळ्या कालावधीसाठी असलेला व्याजदर 
तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम अंतर्गत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी पैसे जमा करता येतात. जर तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला ६.९ टक्के व्याज मिळेल, तर २ किंवा ३ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास ७ टक्के दर निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना ७.५ टक्के दराने व्याज मिळते.

कशी होईल लाखाची कमाई? 
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमधील व्याज उत्पन्नाचे गणित केल्यास, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये गुंतवले असतील, तर ७.५ टक्के दराने, त्याला या कालावधीत ठेवीवर २ लाख २४ हजार ९७४ रुपये व्याज मिळेल. त्याचवेळी, मॅच्युरिटीवर एकूण रक्कम ७ लाख २४ हजार ९२४ रुपये होईल. याचा अर्थ असा की तुम्हाला केवळ व्याजातून २ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई होईल.

कर सवलतीचा लाभ
टाईम डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला आयकर विभाग कायदा १९६१ च्या कलम ८०C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या बचत योजनेत एकल खाते किंवा संयुक्त खाते उघडता येते. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते त्याच्या कुटुंबातील सदस्याद्वारे उघडता येते. यामध्ये किमान १,००० रुपयांमध्ये खाते उघडता येते. ज्यामध्ये व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर जोडले जातात. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही जितके जास्त पैसे गुंतवाल त्या पटीत तुमचे व्याज उत्पन्नही वाढेल.

 

 

 

Web Title: post office best scheme invest in time deposit and get more than 2 lakh rupees only by interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.