नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पोस्ट ऑफिस नवनव्या योजना ग्राहकांसाठी बाजारात आणत आहे. तसेच 1 सप्टेंबरपासून ‘पोस्ट पेमेंट बँक’ही देशभरात सुरू होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे गुंतवण्यासाठी एक विश्वासार्ह माध्यम उपलब्ध होणार आहे. ब-याचदा दुप्पट पैसे मिळावेत या आशेनं लोक नवनव्या योजनेत गुंतवणूक करत असतात. त्यात काहीचं पैसे अशा योजनेत बुडतातही. परंतु पोस्ट ऑफिस तुम्ही गुंतवलेल्या पैशांची हमी देतो. तसेच तुम्ही गुंतवलेले पैसे खात्रीशीर पद्धतीनं दुप्पट किंवा चौपट करून देतो. तसेच पोस्टात गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला जास्त व्याजही मिळते. एसबीआय तुम्हाला 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर 6.50 पासून 6.75 टक्के व्याज देते. तर दुसरीकडे पोस्ट ऑफिस 5 वर्षांच्या एफडीवर 7.4 टक्के व्याज मिळवून देते. त्यामुळेच पोस्टात गुंतवलेल्या पैशांतून मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या 3 बचत योजना
- पोस्ट ऑफिस टॉइम डिपॉजिट अकाउंट (TD)
- नॅशनल सेव्हिंग सार्टिफिकेट (NSC)
- किसान विकास पत्र (KVP)
दररोज 55 रुपये वाचवून काढा 10 लाखांचा विमा, पोस्टाची सुपरहिट योजना
10 रुपये गुंतवा आणि कमवा भरघोस नफा, पोस्टाची जबरदस्त योजना
पोस्टाची नवी योजना, 5 वर्षांच्या गुंतवणुकीत मिळणार जबरदस्त नफा
पोस्ट ऑफिस टॉइम डिपॉजिट अकाउंट (TD)- या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वर्षाला 6.6 टक्के, दोन वर्षाला 6.7 टक्के, तीन वर्षाला 6.9 टक्के, 5 वर्षांसाठी 7.4 टक्क्यांनी व्याज मिळतं. या योजनेत 5 वर्षांसाठी जमा केलेल्या पैशातून चांगला लाभ मिळतो. विशेष म्हणजे या पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर तुम्ही पुन्हा 5 वर्षांसाठी हे पैसे पोस्टात ठेवू शकता. तुम्ही पोस्टात 1 लाख रुपये जमा केल्यास 20 वर्षांनंतर तुम्हाला 4.5 लाख रुपये मिळतात.
नॅशनल सेव्हिंग सार्टिफिकेट (NSC)- या योजनेंतर्गत पैसे गुंतवल्यास सध्या 7.6 टक्के व्याज मिळतं. या योजनेत 5 वर्षांसाठी पैसे जमा केले जातात. ही मर्यादा तुम्ही पुढेही वाढवू शकता. अशा प्रकारे गुंतवणूकदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवल्यास 20 वर्षांनी तुम्हाला 4.32 लाख रुपये मिळतात.
किसान विकास पत्र (KVP)- या योजनेंतर्गत पैसे गुंतवल्यास तुम्हाला 7.3 टक्के व्याज मिळते. या योजनेंतर्गत 9 ते 10 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. तुम्ही गुंतवलेल्या पैशांचा कार्यकाळ संपल्यास तुम्ही ते पुन्हा जमा करू शकता. तुम्ही या योजनेत 20 वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास तुम्हाला चार पट नफा मिळतो. तुम्ही 1 लाख रुपये गुंतवल्यास 19 वर्षं 8 महिन्यांनी तुम्हाला 4.09 लाख रुपये मिळणार आहेत.
पोस्टाच्या 'या' तीन योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास मिळणार चौपट नफा, जाणून घ्या कसे गुंतवाल पैसे ?
1 सप्टेंबरपासून ‘पोस्ट पेमेंट बँक’ ही देशभरात सुरू होणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 04:48 PM2018-08-26T16:48:17+5:302018-08-26T16:50:07+5:30