Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office ची शानदार स्कीम! एका वर्षात मिळेल बँकेपेक्षा जास्त फायदा, जाणून घ्या व्याजासह सर्व डिटेल्स

Post Office ची शानदार स्कीम! एका वर्षात मिळेल बँकेपेक्षा जास्त फायदा, जाणून घ्या व्याजासह सर्व डिटेल्स

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (Fixed deposit) केल्याने तुम्हाला इतर अनेक सुविधाही मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 04:48 PM2022-05-30T16:48:33+5:302022-05-30T16:49:08+5:30

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (Fixed deposit) केल्याने तुम्हाला इतर अनेक सुविधाही मिळतात.

post office fd invest in post office fixed deposit you will get more profit than bank in a year know details | Post Office ची शानदार स्कीम! एका वर्षात मिळेल बँकेपेक्षा जास्त फायदा, जाणून घ्या व्याजासह सर्व डिटेल्स

Post Office ची शानदार स्कीम! एका वर्षात मिळेल बँकेपेक्षा जास्त फायदा, जाणून घ्या व्याजासह सर्व डिटेल्स

नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसमधीलगुंतवणूक ही सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक असल्याचे म्हटले जाते. तुम्हालाही चांगला नफा हवा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (Fixed deposit) केल्याने तुम्हाला इतर अनेक सुविधाही मिळतात.

यामध्ये अधिक नफ्यासह सरकारी गॉरंटी सुद्धा मिळते. तसेच, यामध्ये तिमाही आधारावर व्याज (Post Office FD Interest Rate 2022) मिळण्याची सुविधा दिली जाते. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करणे खूप सोपे आहे. भारतीय पोस्ट ऑफिसने आपल्या वेबसाइटवर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही वेगवेगळ्या 1,2, 3, 5 वर्षांसाठी एफडी करू शकता. 

१) पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करण्यासाठी तुम्हाला भारत सरकारकडून गॉरंटी मिळते.
२) यामध्ये गुंतवणूक केलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात.
३) यामध्ये एफडी ऑफलाइन (कॅश, चेक) किंवा ऑनलाइन (नेट बँकिंग/मोबाइल बँकिंग) द्वारे करू शकता.
४) यामध्ये एकापेक्षा जास्त एफडी करू शकता.
५) याशिवाय, एफडी अकाउंटला जॉइंट करू शकता.
६) यामध्ये पाच वर्षांसाठी एफडी केल्यानंतर तुम्हाला आयटीआर फाइल करतेवेळी टॅक्समध्ये सूट मिळेल.
७) एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहजरित्या ट्रान्सफर करू शकता.

अशाप्रकारे एफडी काढू शकता...
पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करण्यासाठी तुम्ही चेक किंवा कॅश देऊन अकाउंट ओपन करू शकता. यामध्ये कमीत कमी 1000 रुपयांपासून अकाउंट ओपन करता येते. जास्तीत जास्त पैसे जमा करण्याची कोणतेही मर्यादा नाही आहे.  

एफडीवर मिळते शानदार व्याज
या अंतर्गत 7 दिवस ते एक वर्षाच्या एफडीवर 5.50 टक्के व्याज मिळते. हाच व्याजदर 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षांच्या एफडीवर देखील उपलब्ध आहे. तसेच, 3 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.50 टक्के दराने व्याज देखील उपलब्ध आहे. 3 वर्षांच्या एका दिवसापासून 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.70 टक्के व्याज उपलब्ध आहे. म्हणजेच इथे तुम्हाला एफडीवर चांगला नफा मिळेल.

Web Title: post office fd invest in post office fixed deposit you will get more profit than bank in a year know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.