जर तुम्हाला बँकेऐवजी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) एफडी घ्यायची असेल, तर आता तुम्ही घरबसल्या पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाइन फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट उघडू शकता. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचीही गरज भासणार नाही. कारण बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील तुम्हाला एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिट योजनेची सुविधा देते. पोस्ट ऑफिसच्या फिक्स्ड डिपॉझिटला टाइम डिपॉझिट म्हटले जाते.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये (Post Office Time Deposit) वेगवेगळ्या कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर निश्चित केले जातात. यामध्ये गुंतवणूकदारांना चक्रवाढीचा लाभही मिळतो. दरम्यान, पोस्ट ऑफिसच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज वार्षिक आधारावर दिले जाते, परंतु ते तिमाही आधारावर मोजले जाते. जर तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये एका वर्षासाठी पैसे निश्चित केले तर तुम्हाला 5.50 टक्के दराने व्याज दिले जाईल. दोन वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 5.70 टक्के, 3 वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.80 टक्के आणि 5 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 6.70 टक्के दराने व्याज मिळते.
जर तुम्ही पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असेल, तर तुम्हाला यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, तुम्ही ते घरबसल्या इंटरनेटद्वारे सहजपणे ऑनलाइन उघडू शकता.
असे ओपन करा एफडी अकाउंट
- पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते उघडण्याची सुविधा इंट्रा-ऑपरेबल नेटबँकिंग/मोबाइल बँकिंगद्वारे प्रदान केली जाते.
- तुम्हाला रजिस्टर्ड युजर आयडी आणि पासवर्ड वापरून पोस्ट ऑफिस ई-बँकिंग https://ebanking.indiapost.gov.in वर लॉग इन करणे आवश्यक आहे.
- यानंतर, 'जनरल सर्व्हिसेस'च्या ऑप्शनवर जा आणि 'सर्व्हिस रिक्वेस्ट' वर क्लिक करा आणि ते ओपन करा.
- यानंतर, 'नवीन रिक्वेस्ट'च्या ऑप्शनवर जा आणि टाइम डिपॉझिट अकाउंट उघडण्यासाठी अर्ज करा.
- तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. जसे- अॅक्टिव्ह सेव्हिंग अकाउंट, पॅन कार्ड, केवायसी डॉक्युमेंट, अॅक्टिव्ह डीओपी एटीएम किंवा डेबिट कार्ड आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी.
- अर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हेरिफिकेशन केले जाईल.
- व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचे एफडी अकाउंट उघडले जाईल.
ऑफलाइन अकाउंट उघडण्याची प्रक्रिया...
तुम्हाला हे एफडी अकाउंट ऑफलाइन उघडायचे असल्यास ऑफलाइन अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत जावे लागेल. तेथे तुम्हाला पोस्ट ऑफिस एफडी उघडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडून सर्व आवश्यक माहिती घ्यावी लागेल. यानंतर तुम्ही तुमचे टाइम डिपॉझिट अकाउंट ऑफलाइन उघडू शकता.