Join us

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम, सीनिअर सिटिझन स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल तर हे नियम नक्की वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2022 4:06 PM

तुम्ही पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम, सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम किंवा पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट मध्ये देखील गुंतवणूक करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Post Office Schemes: तुम्ही पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (MIS), सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम (SCSS) किंवा पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (टाइम डिपॉझिट किंवा TD) मध्ये देखील गुंतवणूक करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, असे बरेच लोक आहेत ज्यांनी त्यांचे पोस्ट ऑफिस बचत खाते किंवा बँक खाते त्यांच्या MIS, SCSS, TD शी लिंक केलेले नाही आणि अशा परिस्थितीत मिळालेले व्याज त्यांच्या खात्यांमध्ये दिले जात नाही.

पोस्ट ऑफिसकडून दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२२ पासून, या योजनांवर मिळणारे व्याज केवळ गुंतवणूकदाराच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात किंवा योजनेशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केले जाईल. या योजनांमध्ये, गुंतवणूकदारांनी निवडलेल्या पर्यायांच्या आधारे नियमित व्याज मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक कालावधीत मिळते.

परिपत्रकाद्वारे माहिती"काही MIS/SCSS/TD खातेधारकांनी त्यांचे बचत खाते त्यांच्या मासिक/त्रैमासिक क्रेडिटसाठी लिंक केलेले नाही, असे लक्षात आले आहे. त्यामुळे, MIS/SCSS/TD खात्यांवरील व्याज अनपेड आहे आणि ते निरनिराळ्या कार्यालयीन खात्यांमध्ये पडून आहे. शिवाय, असे आढळून आले आहे की अनेक TD खातेधारकांना TD खात्यांच्या वार्षिक व्याजाचीही माहिती नसते," असे पोस्ट विभागाने आपल्या नवीन परिपत्रकात म्हटले आहे.

कसं कराल लिंक?पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या बाबतीत, खातेदाराला फॉर्म SB-83 सबमिट करावा लागेल. हे एमआयएस/एससीएसएस/टीडी खात्यांना पोस्ट ऑफिस बचत खात्यांशी (Post Office saving accounts) जोडेल. याशिवाय एमआयएस, एससीएसएस, टीडी खाते पासबुक आणि पोस्ट ऑफिस बचत खाते पासबुकदेखील पडताळणीसाठी सोबत ठेवावे लागेल.

बँक खात्याच्या बाबतीत, व्यक्तीला रद्द केलेला धनादेश किंवा ज्या बँक खात्याच्या पासबुकमध्ये तो व्याजाची रक्कम जमा करू इच्छितो त्याच्या पहिल्या पानाची प्रत सोबत ECS-1 फॉर्म (ECS मँडेटरी फॉर्म) सबमिट करावा लागेल. याशिवाय, एमआयएस, एससीएसएस, टीडी खाते पासबुक आणि पोस्ट ऑफिस बचत खाते पासबुक देखील व्हेरिफाय करावे लागेल.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक