Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Officeची पैसे दुप्पट करणारी स्कीम, ₹५ लाखाचे बनतील ₹१० लाख; चक्रवाढ व्याजाची कमाल, जाणून घ्या

Post Officeची पैसे दुप्पट करणारी स्कीम, ₹५ लाखाचे बनतील ₹१० लाख; चक्रवाढ व्याजाची कमाल, जाणून घ्या

लोकांच्या गरजेनुसार पोस्ट ऑफिस प्रत्येक वर्गातील लोकांसाठी अनेक योजना सुरू करते. पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे केवळ ११५ महिन्यांत दुप्पट होतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 02:37 PM2024-04-02T14:37:56+5:302024-04-02T14:43:23+5:30

लोकांच्या गरजेनुसार पोस्ट ऑफिस प्रत्येक वर्गातील लोकांसाठी अनेक योजना सुरू करते. पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे केवळ ११५ महिन्यांत दुप्पट होतील.

Post Office money doubling scheme kisan vikas para 5 lakh to become rs 10 lakh Know the maximum of compound interest huge return | Post Officeची पैसे दुप्पट करणारी स्कीम, ₹५ लाखाचे बनतील ₹१० लाख; चक्रवाढ व्याजाची कमाल, जाणून घ्या

Post Officeची पैसे दुप्पट करणारी स्कीम, ₹५ लाखाचे बनतील ₹१० लाख; चक्रवाढ व्याजाची कमाल, जाणून घ्या

लोकांच्या गरजेनुसार पोस्ट ऑफिस प्रत्येक वर्गातील लोकांसाठी अनेक योजना सुरू करते. अशीच एक बचत योजना म्हणजे किसान विकास पत्र. ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे केवळ ११५ महिन्यांत दुप्पट होतील. जोखीममुक्त योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय अधिक चांगला ठरू शकतो.
 

पैसे केले दुप्पट
 

किसान विकास पत्र नावाच्या या योजनेत गुंतवणूक करणार्‍या कोणत्याही गुंतवणूकदाराला चांगलं व्याज मिळतं. तसंच दीर्घ मुदतीत पैसे दुप्पटही होतात.
 

किती मिळतं व्याज
 

या सरकारी योजनेत ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ७.५ टक्के व्याज दिलं जाणार आहे. यामध्ये गुंतवणुकदारांना चक्रवाढीचा लाभही मिळतो, त्यामुळे ही योजना अल्प बचत करणाऱ्यांसाठीही चांगली असल्याचं म्हटलं जातं. या योजनेत तुम्हाला हवी तेवढी रक्कम तुम्ही गुंतवू शकता.
 

किती रुपयांपासून सुरुवात
 

पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेत कोणतीही व्यक्ती फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकते. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही.
 

कसे बनतील ५ लाखांचे १० लाख?
 

सध्याच्या व्याजदरानुसार, जर तुम्ही आज या योजनेत ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला पुढील ११५ महिन्यांत म्हणजे ९ वर्षे आणि ७ महिन्यांत १० लाख रुपये परत मिळतील. म्हणजे तुम्हाला थेट व्याजातून ५ लाख रुपये मिळतील. जर तुम्ही या योजनेत एकरकमी ४ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ११५ महिन्यांत ८ लाख रुपये परत मिळतील. चांगली गोष्ट म्हणजे या योजनेत तुम्हाला चक्रवाढ व्याजाचाही लाभ मिळतो. म्हणजे तुम्हाला व्याजावरही व्याज मिळते. 
 

कर भरावा लागतो का?
 

किसान विकास पत्र योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कर भरावा लागेल. या योजनेचं व्याज करपात्र उत्पन्नाच्या अंतर्गत येते आणि आयटीआर फाइल करताना तुम्हाला ते 'Income from other sources' अंतर्गत दाखवावं लागेल.

Web Title: Post Office money doubling scheme kisan vikas para 5 lakh to become rs 10 lakh Know the maximum of compound interest huge return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.