Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office ची जबरदस्त सेविंग स्कीम, फक्त ५ वर्षात मिळतं ३ लाखांचं एक्स्ट्रा इन्कम!

Post Office ची जबरदस्त सेविंग स्कीम, फक्त ५ वर्षात मिळतं ३ लाखांचं एक्स्ट्रा इन्कम!

मध्यमवर्गीयांसाठी पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीम सर्वात सुरक्षित बचत योजना मानल्या जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 03:30 PM2023-02-15T15:30:44+5:302023-02-15T15:31:56+5:30

मध्यमवर्गीयांसाठी पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीम सर्वात सुरक्षित बचत योजना मानल्या जातात.

post office monthly income scheme mis you can earn more than 3 lakh within five years | Post Office ची जबरदस्त सेविंग स्कीम, फक्त ५ वर्षात मिळतं ३ लाखांचं एक्स्ट्रा इन्कम!

Post Office ची जबरदस्त सेविंग स्कीम, फक्त ५ वर्षात मिळतं ३ लाखांचं एक्स्ट्रा इन्कम!

मध्यमवर्गीयांसाठी पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीम सर्वात सुरक्षित बचत योजना मानल्या जातात. आता जर तुम्हाला पोस्ट ऑफिसची अशी योजना हवी असेल की जिथं तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला दर महिन्याला चांगले उत्पन्नही मिळेल तर अशी एक जबरदस्त योजना आहे. ५ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीत पोस्ट ऑफिसची ही योजना ३ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न देते.

जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा सेवानिवृत्त झाला असाल. तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, कारण या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मासिक उत्पन्न पेन्शन म्हणून वापरू शकता.

National Monthly Income Scheme ची माहिती
'राष्ट्रीय मासिक उत्पन्न योजना' खातं उघडून यामध्ये किमान रु. १,००० गुंतवले तरी चांगली रक्कम जमा करून सर्वोत्तम फायदा मिळवता येतो. एमआयएस खात्यात फक्त एकदा पैसे जमा करावे लागतात आणि यानंतर व्याजाची परतफेड दरमहा केली जाते. जानेवारी-मार्च तिमाहीसाठी सरकार या खात्यावर ७.१ टक्के वार्षिक व्याज देत आहे. मात्र, यामध्ये वेळोवेळी बदल होत राहतात.

असे कमवा ३ लाखांपर्यंतचे एक्स्ट्रा इन्कम
MIS अंतर्गत एका खात्यात जास्तीत जास्त ४.५ लाख रुपये आणि संयुक्त खात्यात ९ लाख रुपये मंजूर आहेत. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पातील भाषणात अनुक्रमे ९ लाख आणि १५ लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे. या योजनेत तुम्ही एकाच वेळी ९ लाख रुपये गुंतवले आहेत असे समजले तर सध्याच्या व्याजदरानुसार तुमचे दरवर्षी ६३,९०० रुपये उत्पन्न असेल. म्हणजे दरमहा रु ५,००० पेक्षा जास्त मिळकत प्राप्त होते. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे, म्हणजेच तुमचे एकूण अतिरिक्त उत्पन्न  ३,१९,५०० रुपये होईल.

या योजनेत, तुम्हाला 1 वर्षात आणि 3 वर्षात योजनेबाहेर येण्याची सुविधा देखील मिळते. तसंच पालक देखील त्यांच्या मुलांसाठी या खात्यात गुंतवणूक करू शकतात. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे खाते त्यांच्या स्वतःच्या नावावर उघडलं जातं.

Web Title: post office monthly income scheme mis you can earn more than 3 lakh within five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.