Lokmat Money > बिझनेस न्यूज > दरमहा मिळेल ५५५० रुपयांचे निश्चित व्याज! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोण करू शकतो गुंतवणूक?

दरमहा मिळेल ५५५० रुपयांचे निश्चित व्याज! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोण करू शकतो गुंतवणूक?

Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला एकदाच ठराविक रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर दरमहिन्याला तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:02 IST2025-04-02T15:59:00+5:302025-04-02T16:02:06+5:30

Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला एकदाच ठराविक रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर दरमहिन्याला तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होते.

post office monthly income scheme mis you will get fixed interest of rs 5550 every month | दरमहा मिळेल ५५५० रुपयांचे निश्चित व्याज! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोण करू शकतो गुंतवणूक?

दरमहा मिळेल ५५५० रुपयांचे निश्चित व्याज! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोण करू शकतो गुंतवणूक?

Post Office Schemes : पोस्ट ऑफिस केवळ पत्रव्यवहार किंवा पार्सल पोहचवण्याचं काम करत नाही. त्या व्यतिरिक्त पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या बँकिंग सेवाही पुरवत आहे. एवढेच नाही तर पोस्ट ऑफिसच्या काही योजना अशा आहेत, ज्यात बँकांपेक्षा जास्त व्याजदर मिळतो. यात अल्प आणि दीर्घ मुदतीच्या अनेक योजना आहेत. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही दरमहा कमाई करू शकता. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा ५५५० रुपये निश्चित व्याज मिळू शकते.

मंथली इनकम स्कीम योजना काय आहे?
पोस्ट ऑफिसची एमआयएस (मंथली इनकम स्कीम) ही एक योजना आहे, ज्यामध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते. यानंतर व्याजाचे पैसे दरमहा तुमच्या खात्यात येत राहतात. या पोस्ट ऑफिस योजनेत, तुम्ही किमान १००० रुपयांनी खाते उघडू शकता. MIS योजनेत जास्तीत जास्त ९ लाख जमा केले जाऊ शकतात. या योजनेअंतर्गत संयुक्त खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करता येतात. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ३ लोक जोडले जाऊ शकतात. सध्या पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेवर ७.४ टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे, जे दरमहा तुमच्या खात्यात जमा होते.

वाचा - PPF मध्ये गुंतवणूक करता? मग ५ एप्रिलची तारीख लक्षात ठेवा; वर्षभर मिळतो हा फायदा

महिन्याला ५५५० रुपये कसे मिळणार?
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ५ वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह येते. यातही काही प्रतिकूल परिस्थितीत, तुम्ही खाते बंद करून सर्व पैसे काढू शकता. MIS योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिस बचत खाते देखील असणे आवश्यक आहे. तुम्ही या योजनेत ९ लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला ५ वर्षांसाठी दरमहा ५५५० रुपये निश्चित आणि हमी असलेले व्याज मिळेल. ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही जमा केलेले संपूर्ण ९ लाख रुपये तुमच्या खात्यात परत केले जातील. यासोबतच तुम्हाला ५ वर्षात ५५५० रुपयांच्या हिशोबाने एकूण ३,३३,००० रुपये व्याजही मिळेल.

Web Title: post office monthly income scheme mis you will get fixed interest of rs 5550 every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.