Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office च्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा; बँक FD पेक्षा चांगला परतावा अन् फायदे मिळवा

Post Office च्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा; बँक FD पेक्षा चांगला परतावा अन् फायदे मिळवा

बँकेतील मुदत ठेवीवर मिळणारे व्याज सातत्याने कमी होत चालले आहे. अशात पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. पाहा, डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 12:44 PM2022-03-21T12:44:15+5:302022-03-21T12:45:21+5:30

बँकेतील मुदत ठेवीवर मिळणारे व्याज सातत्याने कमी होत चालले आहे. अशात पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. पाहा, डिटेल्स...

post office national savings certificate scheme better returns than bank fd scheme know all details | Post Office च्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा; बँक FD पेक्षा चांगला परतावा अन् फायदे मिळवा

Post Office च्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा; बँक FD पेक्षा चांगला परतावा अन् फायदे मिळवा

नवी दिल्ली: भारतात गेल्या अनेक दशकांपासून भारतीय पोस्ट ऑफिसचे (Post Office) प्रचंड मोठे जाळे आहे. एलआयसीप्रमाणे पोस्ट ऑफिसवर देशवासीयांचा मोठा विश्वास आहे. पोस्ट ऑफिसच्याही अनेक अशा योजना आहेत, ज्याचा उत्तम परतावा आपल्याला मिळू शकतो. देशातील कोट्यवधी जनतेची पोस्ट ऑफिसच्या नानाविध योजनांमध्ये गुंतवणूक आहे. पोस्ट ऑफिसने सुरू केलेल्या बँकिंग सुविधेलाही तुफान प्रतिसाद मिळाला आहे. यातच आता पोस्ट ऑफिसची अशी एक योजना आहे. यामध्ये पैसे गुंतवल्यास बँकेच्या मुदत ठेवीपेक्षा (FD) चांगला परतावा तर मिळूच शकतो. मात्र, या योजनेच्या अन्य तरतुदींमुळे फायदाही होऊ शकतो. 

गेल्या काही वर्षांपासून बँकेतील मुदत ठेवीवर मिळणारे व्याज सातत्याने घटताना दिसत आहे. पूर्वीप्रमाणे मुदत ठेवींवर व्याज चांगले मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. असे असले तरी सुरक्षित आणि खात्रीशीर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेकजण मुदत ठेवीला प्राधान्य देतात. सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा हवा असल्यास पोस्ट ऑफिसची एक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास बँकेतील एफडीपेक्षा चांगला परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव आहे, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट.

आयकराची १.५ लाखांपर्यंत सवलत

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत गुंतवणूक केल्यास ६.८ टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते.  बँकेतील मुदत ठेवीवर साधारणपणे ५.८ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेतील गुंतवणुकीवर सुमारे १ टक्के जास्त व्याजदराचा लाभ मिळतो. या योजनेत कोणतीही व्यक्ती एका वर्षांत किमान एक हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकते. जर तुम्ही १० वर्षासाठी गुंतवणूक केल्यास मॅच्युअरिटीवर तुम्हाला गुंतवणुकीच्या दुप्पट रक्कम मिळू शकते. त्याशिवाय या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर खात्याच्या कलम ८०सी नुसार १.५ लाखापर्यंत सवलत मिळू शकते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेची वैशिष्ट्ये काय?

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेतील गुंतवणुकीवर बँकेपेक्षा अधिक व्याज मिळू शकेल. हा व्याजदर वार्षिक आधारावर उपलब्ध आहे आणि ही सर्व रक्कम मॅच्युरिटीनंतर मिळेल. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एकट्याचे किंवा संयुक्त अशी दोन्ही खाती उघडू शकता. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोकांचा समावेश केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे खाते देखील पालकांच्या देखरेखीखाली उघडता येते.

दरम्यान, या खात्यातून १० वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधी पैसे काढायचे असतील. तर, तुम्ही ३ वर्षांनंतर पैसे काढू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता. पैसे काढण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. या खात्यात १ लाखांपेक्षा कमी रक्कम जमा झाली असेल, तर तुम्ही एकाच वेळी सर्व पैसे काढू शकता.
 

Web Title: post office national savings certificate scheme better returns than bank fd scheme know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.