नवी दिल्लीः पोस्टातून पत्र व्यवहार करण्याबरोबरच आपल्याला बँकिंग सुविधाही मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये लोकांना सेव्हिंग अकाऊंट उघडण्याची सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे पोस्टात फक्त 20 रुपयांत सेव्हिंग खातं उघडता येते, जे बँकेच्या चार्जेसच्या तुलनेत फारच कमी असतात. या खात्यात आपल्याला कमीत कमी 50 रुपये बॅलन्स ठेवावा लागतो. पोस्टातील सेव्हिंग खात्यामध्येही बँकेतल्या सेव्हिंग अकाऊंटसारखीच सुविधा मिळतात. पोस्टाच्या सेव्हिंग खात्यात आपल्याला ATM आणि चेक बुकची सुविधाही मिळते.
तसेच या अकाऊंटवर 4 टक्के व्याज दिले जाते. चेक नको असलेलं सेव्हिंग अकाऊंट फक्त 20 रुपयांमध्ये उघडता येणार नाही. त्यात कमीत कमी 50 रुपये ठेवावे लागणार आहेत. तर चेकची सुविधा असलेलं खातं उघडण्यासाठी 500 रुपये भरावे लागणार आहेत. तसेच त्यात कमीत कमी 500 रुपये बॅलन्स ठेवावं लागणार आहे. बचत खात्यातील 10 हजारांपर्यंतच्या रकमेवर कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही. दोन ते तीन जण मिळून संयुक्त खातंही उघडू शकतात. बचत खात्य कार्यान्वित राहण्यासाठी तीन वर्षांतून एकदा तरी व्यवहार होणार आवश्यक असतं.
- जाणून घ्या या खात्याची खासियत
तर दुसऱ्या प्रकारातलं सेव्हिंग अकाऊंट हे 500 रुपये जमा करून उघडता येणार आहे. या खात्यामध्ये चेकबुकसह एटीएमची सुविधा मिळणार आहे. या खात्यामध्ये कमीत कमी 500 रुपये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. पोस्ट ऑफिस सेव्हिंग योजनेतून मिळणारं 10 हजार रुपयांपर्यंतचं व्याज हे पूर्णतः टॅक्स फ्री असतं. तसेच हे खातं कोणत्याही पोस्ट ऑफिस वळतं करता येते.
- असं उघडू शकतो सेव्हिंग खातं
पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाऊंट उघडण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म पोस्ट ऑफिसशिवाय इतर साइटवरून डाऊनलोड करता येतो. सेव्हिंग अकाऊंट उघडण्यासाठी KYC पूर्ण करावं लागतं.
- खातं उघडण्यासाठी लागतात हे दस्तावेज
पोस्टात खातं उघडण्यासाठी आयडी प्रूफमध्ये मतदाराचं कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, ऍड्रेस प्रूफमध्ये बँकेचं पासबुक, पासपोर्ट, रेशन कार्ड, विजेचं बिल, फोनचं बिल, आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तसेच पासपोर्ट साइज फोटो आणि संयुक्त खात्यात इतर खातेधारकांचे फोटो असणं गरजेचं आहे.