मुंबई : पैसे गुतंवणूक करण्यासाठी पोस्टाचा अनेक योजना फायदेशीर आहेत. या योजनामार्फत ग्राहकांना चांगले रिटर्न मिळत आहेत. पोस्ट ऑफिसमध्येगुंतवणूक केल्यामुळे चांगल्या रिटर्नसोबत सकराकी हमी सुद्धा मिळते. तसेच, योजनेत आयकर अॅक्ट 80 सी नुसार करात सूट मिळू शकते.
बँक योजनेच्या तुलनेत सर्वाधिक फायदा पोस्ट ऑफिसच्या योजनेत मिळतो. जर बँक आणि पोस्ट ऑफिसच्या व्याज दराची तुलना केली तर एसबीआय 5 चे 10 वर्षांच्या एफडीवर जास्तीत जास्त 6.60 टक्के व्याज देत आहे. मात्र, पोस्ट ऑफिसच्या अनेक अशा योजनेमध्ये ज्यामध्ये पाच वर्षांच्या एफडीवर 7.8 टक्कांपर्यंत व्याज मिळत आहे. दरम्यान, आम्ही आपल्यासाठी पोस्ट ऑफिसच्या अशा तीन योजनांची माहिती देत आहोत, त्या योजनेद्वारे तुम्ही पैसे दुप्पट किंवा चौपट करु शकता.
1) पोस्ट ऑफिस टाईम डिपोजिट अकाऊंट (TD) योजनापोस्ट ऑफिसच्या टाइम डिपोजिट अकाऊंट (Post Office Time Deposit Account (TD) योजनेत पैसे यासाठी जमा करावेत की सध्या या योजनेत जास्तीत जास्त 7.8 टक्के व्याज दिले जात आहे. जर या व्याज दरावर एक लाख रुपये जमा केल्यास पाच वर्षांनंतर 4.6 लाख रुपये रिटर्न मिळेल. या रकमेतून म्हणजेच एक लाख रुपये कमी केल्यास 20 वर्षांनंतर एकूण 3.6 लाख रुपये व्याज मिळेल.
2) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)योजनापोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Savings Certificates) योजनेत सध्या 8 टक्कांपर्यंत व्याज मिळत आहे. उदा. जर या योजनेत एक लाख रुपये जमा केल्यानंतर 8 टक्के व्याजाच्या हिशोबाने वीस वर्षानंतर 4.8 लाख रुपये होतात. म्हणजेच, 20 वर्षात 3.8 लाख रुपये व्याज मिळणार आहे.
3) किसान विकास पत्र (KVP) योजनासध्या किसान विकास पत्र Kisan Vikas Patra (KVP ) योजनेत जास्तीत जास्त 7.7 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत एका वेळेत चार महिन्यांपासून ते 9 वर्षांपर्यंत पैसे जमा करु शकता. जसे की गुंतवणूक मॅच्योर झाल्यानंतर ती दुसऱ्यांदा जमा केली जाऊ शकते. जर हे पैसे 20 वर्षांपर्यंत जमा होत राहतात, तर मिळणारी रक्कम चौपटहून अधिक होईल. उदा. जर किसान विकास पत्र योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 19 वर्ष 8 महिन्यात ही रक्कम जवळपास 4.6 लाख रुपये होईल.