Lokmat Money > बिझनेस न्यूज > केवळ ५०० रुपयांमध्ये उघडता येतं Post Office चं सेव्हिंग अकाऊंट, बँकांपेक्षाही मिळतं अधिक व्याज

केवळ ५०० रुपयांमध्ये उघडता येतं Post Office चं सेव्हिंग अकाऊंट, बँकांपेक्षाही मिळतं अधिक व्याज

तुम्हाला कोणत्याही स्कीमचा लाभ घ्यायचा असेल किंवा पैशाशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असेल, या सर्वांसाठी बचत खातं असणं अत्यंत आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 12:16 PM2024-02-17T12:16:33+5:302024-02-17T12:21:05+5:30

तुम्हाला कोणत्याही स्कीमचा लाभ घ्यायचा असेल किंवा पैशाशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असेल, या सर्वांसाठी बचत खातं असणं अत्यंत आवश्यक आहे.

Post Office Savings Account can be opened for only 500 rupees more interest than banks know details | केवळ ५०० रुपयांमध्ये उघडता येतं Post Office चं सेव्हिंग अकाऊंट, बँकांपेक्षाही मिळतं अधिक व्याज

केवळ ५०० रुपयांमध्ये उघडता येतं Post Office चं सेव्हिंग अकाऊंट, बँकांपेक्षाही मिळतं अधिक व्याज

Post Office Savings Account: तुम्हाला कोणत्याही स्कीमचा लाभ घ्यायचा असेल किंवा पैशाशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असेल, या सर्वांसाठी बचत खातं असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आज बहुतेक लोकांकडे बचत खातं आहे. काही लोकांकडे एका पेक्षा अधिक खाती देखील असतील. जरी बहुतेक लोक हे खातं बँकेत उघडण्यास प्राधान्य देतात, परंतु बँकेप्रमाणे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्येही बचत खातं उघडू शकता. याचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल लोकांना कल्पना नाही. याबद्दल जाणून घेऊ.
 

बँकांपेक्षा अधिक व्याज
 

बचत खात्यात जी रक्कम जमा केली जाते, त्यावर बँकांकडून वेळोवेळी व्याज दिलं जातं, परंतु हे व्याज साधारणतः २.७०% ते ३% असतं. पण तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यावर बँकांपेक्षा जास्त व्याज मिळतं. मोठ्या बँका आणि पोस्ट ऑफिसच्या नियमित बचत खात्यांवर उपलब्ध व्याजाची माहिती जाणून घेऊ.
 

SBI बचत खात्यावरील व्याज: २.७०%
PNB बचत खात्यावरील व्याज: २.७०%
BOI बचत खात्यावरील व्याज: २.९०%
BOB बचत खात्यावरील व्याज: २.७५%
HDFC बचत खात्यावरील व्याज: ३% ते ३.५०%
ICICI बचत खात्यावरील व्याज: ३% ते ३.५०%
 

किमान ५०० रुपयांची गुंतवणूक
 

तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं उघडत असलात तरी, सर्व ठिकाणी तुमच्या खात्यात किमान शिल्लक राखणं फार महत्वाचं आहे. अन्यथा दंड भरावा लागेल. साधारणपणे, बँकांमधील नियमित बचत खात्यावर किमान शिल्लक मर्यादा १००० रुपये असते, परंतु पोस्ट ऑफिस बचत खातं किमान ५०० रुपयांसह सुरू करता येतं.


तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं उघडत असलात तरी, सर्व ठिकाणी तुमच्या खात्यात किमान शिल्लक राखणं फार महत्वाचं आहे. अन्यथा दंड भरावा लागतो. साधारणपणे, बँकांमधील नियमित बचत खात्यावर किमान शिल्लक मर्यादा किमान १००० रुपये असते, परंतु पोस्ट ऑफिस बचत खातं किमान 500 रुपयांमध्ये उघडता येतं.
 

कोण खातं उघडू शकतं?
 

कोणतीही प्रौढ व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकते. याशिवाय दोन लोक त्यांचं खातं संयुक्तपणे उघडू शकतात. अल्पवयीन व्यक्तीसाठी खातं उघडायचे असल्यास, त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या वतीनं खातं उघडू शकतात. तर १० वर्षांवरील अल्पवयीन व्यक्ती स्वतःच्या नावानं खातं उघडू शकतो. प्रौढ झाल्यानंतर, अल्पवयीन व्यक्तीनं त्याच्या नावावर खातं हस्तांतरित करण्यासाठी नवीन खातं उघडण्याचा फॉर्म आणि केवायसी कागदपत्रे संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागतात.

Web Title: Post Office Savings Account can be opened for only 500 rupees more interest than banks know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.