Join us

घरबसल्या तपासता येणार पोस्ट बचत खात्याचे स्टेटमेंट; जाणून घ्या कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 3:01 PM

Post Office : आता पोस्टात फेऱ्या मारणे कमी होणार आहे. कारण घरबसल्या तुमच्या बचत खात्याचे स्टेटमेंट पाहता येणार आहे.

नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये लोक गुंतवणूक करतात. तुम्ही सुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते काढले असेल आणि तुम्हाला सतत खात्याचे स्टेटमेंट पाहण्यासाठी पोस्टात जावे लागत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आता पोस्टात फेऱ्या मारणे कमी होणार आहे. कारण घरबसल्या तुमच्या बचत खात्याचे स्टेटमेंट पाहता येणार आहे.

लोकांची सोय लक्षात घेऊन भारत सरकारने पोस्ट ऑफिस बचत बँक योजनेसाठी ई-पासबुक सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा सुरू केल्यानंतर तुम्हाला खात्याचे स्टेटमेंट पाहण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरी थांबून आरामात पोस्ट ऑफिस बचत बँक खात्याचे स्टेटमेंट ऑनलाइन पाहू शकता.

स्टेटमेंट तुम्ही स्वतः पाहू शकतापूर्वी ते फक्त मिनी स्टेटमेंटपुरते मर्यादित होते. आता पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांना त्यांच्या खात्याचे स्टेटमेंट स्वतःच मिळू शकणार असून त्यासाठी त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे, ही 'ई-पासबुक सुविधा' सुरू केल्यानंतर, पोस्ट ऑफिस बचत बँक खातेधारकांना फक्त मिनी स्टेटमेंटऐवजी त्यांचे संपूर्ण बँक पासबुक उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत, काही स्टेप्स फॉलो करून ते ऑनलाइन तपासले जाऊ शकते.

पोस्ट ऑफिस योजनापोस्ट ऑफिस विविध योजना चालवते, ज्याच्या मदतीने लोक गुंतवणूक करू शकतात. यामध्ये पोस्ट ऑफिस बचत बँक योजना (पोस्ट ऑफिस बचत खाते) देखील समाविष्ट आहे. यामध्ये लोक आपली बचत सुरक्षित ठेवू शकतात.

अशाप्रकारे ऑनलाइन स्टेटमेंट पाहू शकता...1. पोस्ट ऑफिस अॅपमध्ये लॉग इन करा.2. मोबाईल बँकिंग वर जा.3. तुमच्या बचत खात्याची माहिती भरा.4. 'Go' बटणावर क्लिक करा.5. तुम्हाला पोस्ट ऑफिस अकाउंट डॅशबोर्डवर पुनर्निर्देशित केले जाईल.6. येथे तुम्हाला बॅलन्स आणि स्टेटमेंट तपासण्याचा ऑप्शन मिळेल.7. स्टेटमेंट वर क्लिक करा.8. तुम्हाला मिनी स्टेटमेंट आणि अकाउंट स्टेटमेंटचा ऑप्शन मिळेल.9. स्टेटमेंट ऑप्शनवर क्लिक करा.10. ज्या कालावधीसाठी तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिस खात्याच्या पासबुकचे डिटेल्स पहायचे आहेत तो कालावधी निवडा.11. स्टेटमेंट डाउनलोड करा.

टॅग्स :पोस्ट ऑफिसबँकव्यवसाय