नवी दिल्लीः सुरक्षित भविष्यासाठी छोटी छोटी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. जास्त करून लोक छोटी रक्कम एखाद्या योजनेत गुंतवण्यास निरुत्साह दाखवतात. मोठी रक्कम गुंतवल्यास फायदाही मोठा होतो, अशी लोकांची धारणा आहे. त्यासाठी चांगल्या योजनाही उपलब्ध आहेत. पोस्टाच्या रेकरिंग डिपॉझिट(RD)मध्येही गुंतवल्यास आपल्याला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. या खात्यामधल्या पैशावर मिळालेल्या व्याजाच्या 10 हजारांपर्यंतच्या रकमेवर कोणताही कर द्यावा लागत नाही. पोस्टात बचत खातं उघडण्यासाठी आपल्याला फक्त 20 रुपये खर्च करावे लागतात. पोस्टातील बचत खातं हे रोख रकमेतूनच उघडता येते. ज्यावेळी आपण 500 रुपये देऊन खातं उघडता, तेव्हा आपल्याला पोस्ट ऑफिस धनादेशाची सुविधा उपलब्ध करून देते. तसेच कमीत कमी खात्यात 500 रुपये जमा करून ठेवावेच लागतात. तसेच आपल्याला धनादेश नको असल्यास कमीत कमी 50 रुपये जमा ठेवून खातं कार्यान्वित ठेवू शकतो.तसेच पोस्टात खातं उघडतेवेळी किंवा उघडल्यानंतर आपल्याला नॉमिनीची सुविधाही पुरवली जाते. पोस्टातील बचत खात्याला एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरितही करता येते. एका पोस्टाच्या शाखेत एकच खातं उघडले जाते. पोस्ट ऑफिसचं बचत खातं अल्पवयीन मुलाच्या नावेही उघडता येते. जर अल्पवयीन मुलगा 10 वर्षं किंवा त्याहून जास्त वयाचा असेल आणि त्यानं दोन खाती उघडल्यास ती कार्यान्वित ठेवता येतात. सज्ञान झाल्यानंतर त्याला आधीचं खातं स्वतःच्या नावे करता येते. तसेच पोस्टात दोन जण मिळून संयुक्त खातंही उघडू शकतात. संयुक्त खात्याला एकेरी खात्यात आणि एकेरी खात्याचं संयुक्त खात्यामध्ये हस्तांतरित करता येते. तीन आर्थिक वर्षांत खात्यामधून एकदा पैसे काढणे आणि टाकण्याचे व्यवहार करावे लागतात, तरच ते खातं कार्यान्वित राहतं. तसेच पोस्टाच्या खात्यावर आता एटीएमची सुविधाही पुरवते.कसं सुरू कराल रेकरिंग डिपॉझिट- आरडी खातं पोस्ट ऑफिस किंवा जाऊन उघडता येतं, तसेच आपण हे खातं ऑनलाइनही उघडू शकतो. पोस्टात आरडी उघडण्यासाठी तुम्हाला रोख रक्कम किंवा धनादेश द्यावा लागतो. तुमचं खातं एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्येही ट्रान्सफर करता येते. तसेच दोन जणांच्या नावे संयुक्त खातंही उघडता येते. आरडी खातं उघडण्यापूर्वी पहिल्यांदा कुठे जास्त व्याज मिळत ते पाहावे. जर आपल्याला आरडीवर 10 हजारांहून अधिक व्याज मिळत असेल तर त्यावर आपल्याला कर द्यावा लागू शकतो. पोस्ट खात्यातील 1 ते 5 वर्ष आरडी योजनेत ग्राहकाला 7.4 टक्के व्याज देण्यात येत आहे. मात्र, आरडीवर 10 हजारपेक्षा अधिक वार्षिक व्याज मिळत असेल तर त्यासाठी ग्राहकांना टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजेच, ग्राहकांना यावर कर बसेल.
10 रुपयांपासून गुंतवणूक करा अन् कमवा 2.17 लाख, पोस्टाची जबरदस्त योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 7:04 PM