Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office Scheme: 115 महिन्यांत पैसे दुप्पट, पाहा पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना...

Post Office Scheme: 115 महिन्यांत पैसे दुप्पट, पाहा पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना...

Post Office Scheme : पोस्‍ट ऑफिसच्या या योजनेत तुमचे पैसेही सुरक्षित राहतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 08:54 PM2024-08-28T20:54:36+5:302024-08-28T20:54:52+5:30

Post Office Scheme : पोस्‍ट ऑफिसच्या या योजनेत तुमचे पैसेही सुरक्षित राहतील.

Post Office Scheme: Double money in 115 months, see this superhit scheme | Post Office Scheme: 115 महिन्यांत पैसे दुप्पट, पाहा पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना...

Post Office Scheme: 115 महिन्यांत पैसे दुप्पट, पाहा पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना...

Post Office Scheme : आज बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, आपले पैसे सुरक्षित राहावे, यासाठी बहुतांश लोक सरकारी योजनांमध्येच पैसे गुंतवतात. अनेकांचा असा समज आहे की, सरकारी योजनांमध्ये मोठा परतावा मिळत नाही. पण, अशा काही सरकारी योजना आहेत, ज्यात तुम्हाला चांगला परतावा तर मिळतोच, शिवाय तुमचै पैसे एकदम सुरक्षित राहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. 

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव किसन विकास पत्र (KVP) आहे. या योजनेंतर्गत सध्या वार्षिक 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे. भारत सरकारकडून चालविल्या जाणार्‍या किसन विकास पत्र योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागते. यात तुम्हाला तिमाही आधारावर व्याज दिले जाते. या योजनेत आपण निश्चित कालावधीत पैसे दुप्पट करू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आपण पोस्ट ऑफिसद्वारे खाते उघडू शकता.

115 महिन्यांत पैसे दुप्पट 
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजने तुम्ही किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. कमाल गुंतवणूकीची मर्यादा नाही. या योजनेत दरवर्षी 7.5 टक्के दराने परतावा मिळतो. गेल्या वर्षी एप्रिल 2023 मध्ये योजनेचे व्याज दर 7.2 टक्क्यांवरुन 7.5 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. यापूर्वी, या योजनेत पैसे दुप्पट होण्यास 120 महिने लागायचे, परंतु आता 115 महिन्यांत, म्हणजेच 9 वर्षे आणि सात महिन्यात पैसे दुप्पट होतात.

Web Title: Post Office Scheme: Double money in 115 months, see this superhit scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.