Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोस्ट ऑफिसची शानदार योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, दरमहा मिळतील 2500 रुपये 

पोस्ट ऑफिसची शानदार योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, दरमहा मिळतील 2500 रुपये 

Post Office Saving Scheme : पोस्ट ऑफिसची एमआयएस (MIS) ही एक अशी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करून दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात लाभ घेऊ शकाल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 07:24 PM2022-09-19T19:24:31+5:302022-09-19T19:25:35+5:30

Post Office Saving Scheme : पोस्ट ऑफिसची एमआयएस (MIS) ही एक अशी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करून दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात लाभ घेऊ शकाल.

post office scheme how to open post office monthly income scheme know here mis interest rate and details | पोस्ट ऑफिसची शानदार योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, दरमहा मिळतील 2500 रुपये 

पोस्ट ऑफिसची शानदार योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, दरमहा मिळतील 2500 रुपये 

नवी दिल्ली : तुम्हालाही सुरक्षित आणि निश्चित नफा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिसची योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. पोस्ट ऑफिसची एमआयएस (MIS) ही एक अशी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करून दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात लाभ घेऊ शकाल. या खात्याचे (Post Office Saving Scheme) अनेक फायदे आहेत.

दरम्यान, यामध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावावर देखील खाते उघडले जाऊ शकते. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने हे विशेष खाते (Post Office Monthly Income Scheme) उघडले तर तुम्हाला त्याच्या शाळेच्या फीची चिंता करण्याची गरज नाही. या योजनेशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया....

कोठे उघडू शकता खाते? (Post Office Monthly Income Scheme Benefits) 
- तुम्ही हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता.
- या अंतर्गत, किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करता येतील.
- सध्या, या योजनेअंतर्गत व्याज दर 6.6 टक्के आहे.
- जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही हे खाते (MIS बेनिफिट्स) त्याच्या नावावर उघडू शकता.
- जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याऐवजी पालक हे खाते उघडू शकतात.
- या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षे आहे, त्यानंतर ती बंद केली जाऊ शकते.
- या खात्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे सिंगल किंवा ज्वाइंट खाते उघडू शकता. 

जाणून घ्या, कॅलक्युलेशन... (Post Office Monthly income Scheme Calculator)
- जर तुमचा मुलगा 10 वर्षांचा असेल आणि तुम्ही त्याच्या नावावर 2 लाख रुपये जमा केले तर दर महिन्याला तुमचे व्याज सध्याच्या 6.6 टक्के दराने 1100 रुपये होईल. 
- पाच वर्षांत, हे व्याज एकूण 66 हजार रुपये होईल आणि शेवटी तुम्हाला 2 लाख रुपयांचा परतावा देखील मिळेल.
- अशा प्रकारे तुम्हाला एका मुलासाठी 1100 रुपये मिळतील, जे तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी वापरू शकता.
- ही रक्कम पालकांसाठी चांगली मदत होऊ शकते.
- त्याचप्रमाणे तुम्ही 4.5 लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला दरमहा सुमारे 2500 रुपये मिळतील.

Web Title: post office scheme how to open post office monthly income scheme know here mis interest rate and details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.