Lokmat Money > बिझनेस न्यूज > Investment Tips: Post Office मध्ये गुंतवणूक आहे? ‘या’ योजनेत ५ वर्षांत होतील १३.९० लाख; टॅक्सही लागणार नाही!

Investment Tips: Post Office मध्ये गुंतवणूक आहे? ‘या’ योजनेत ५ वर्षांत होतील १३.९० लाख; टॅक्सही लागणार नाही!

Investment Tips: पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत पैसे गुंतवले, तर चांगला परतावा मिळू शकतो. शिवाय टॅक्स बचतही होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 01:51 PM2022-11-19T13:51:39+5:302022-11-19T13:52:47+5:30

Investment Tips: पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत पैसे गुंतवले, तर चांगला परतावा मिळू शकतो. शिवाय टॅक्स बचतही होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

post office scheme investment tips you will get 13 90 lakh in 5 years national savings certificate with tax savings | Investment Tips: Post Office मध्ये गुंतवणूक आहे? ‘या’ योजनेत ५ वर्षांत होतील १३.९० लाख; टॅक्सही लागणार नाही!

Investment Tips: Post Office मध्ये गुंतवणूक आहे? ‘या’ योजनेत ५ वर्षांत होतील १३.९० लाख; टॅक्सही लागणार नाही!

Post Office Investment Tips: गेल्या अनेक दशकांपासून Post Office हे भारतीयांचे अढळ विश्वासाचे स्थान आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आताच्या घडीला उपलब्ध असून, कोट्यवधी देशवासी नानाविध योजनांचा लाभ घेत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते. पोस्ट ऑफिस अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये तुमचे पैसेही सुरक्षित राहतात, यासोबतच तुम्हाला हमखास परतावाही मिळतो. यातच एका योजनेतून केवळ ५ वर्षांत काही गुंतवणुकीतून १३.९० लाख मिळवण्याची संधी प्राप्त होऊ शकते. 

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ची सुविधा पोस्ट ऑफिसद्वारे ग्राहकांना प्रदान केली जाते. या योजनेत ग्राहकांना बंपर परतावा मिळतो. ही एक छोटी बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. याशिवाय तुम्ही NSC मध्ये एकापेक्षा जास्त खाती उघडू शकता. तुम्हाला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्येही कर सवलतीचा लाभ मिळतो. गुंतवणूकदार आयकर कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलत घेऊ शकतात.

फक्त १ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळू शकतील? 

पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत ग्राहकांना वार्षिक ६.८ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. यामध्ये ग्राहकांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो, परंतु तुम्हाला सर्व पैसे केवळ मॅच्युरिटीवरच मिळतात. पोस्ट ऑफिस वेबसाइटनुसार, गुंतवणूकदारांना या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही या योजनेत १ हजार रुपये गुंतवल्यास पुढील ५ वर्षांनी तुम्हाला १३८९.४९ रुपये मिळतील. तुम्ही यामध्ये किमान १ हजार रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता आणि १०० च्या पटीत गुंतवणूक करू शकता.

एकदाच फक्त ५ हजार रुपये गुंतवा अन् आयुष्यभर कमाई करा; पाहा, Post Officeची भन्नाट योजना!

१३.९० लाख रुपये कसे मिळू शकतील? 

जर तुम्ही या योजनेत १० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली, तर ५ वर्षांच्या मुदतीनंतर, ग्राहकांना १३,८९,४९३ रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला ३,८९,४९३ रुपये हमी व्याज मिळेल. तुमच्या घराजवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: post office scheme investment tips you will get 13 90 lakh in 5 years national savings certificate with tax savings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.