Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office मध्ये 'हे' शानदार अकाउंट उघडा, लोनपासून कॅशबॅकपर्यंतचे मिळतील फायदे, जाणून घ्या...

Post Office मध्ये 'हे' शानदार अकाउंट उघडा, लोनपासून कॅशबॅकपर्यंतचे मिळतील फायदे, जाणून घ्या...

Post Office : प्रीमियम सेव्हिंग अकाउंट अंतर्गत लोकांना कॅशबॅकपासून लोन, डोअरस्टेप बँकिंगपर्यंतच्या शानदार सुविधा मिळत आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 03:04 PM2022-12-24T15:04:55+5:302022-12-24T15:06:16+5:30

Post Office : प्रीमियम सेव्हिंग अकाउंट अंतर्गत लोकांना कॅशबॅकपासून लोन, डोअरस्टेप बँकिंगपर्यंतच्या शानदार सुविधा मिळत आहेत. 

post office scheme post office premium saving account details in hindi see here details | Post Office मध्ये 'हे' शानदार अकाउंट उघडा, लोनपासून कॅशबॅकपर्यंतचे मिळतील फायदे, जाणून घ्या...

Post Office मध्ये 'हे' शानदार अकाउंट उघडा, लोनपासून कॅशबॅकपर्यंतचे मिळतील फायदे, जाणून घ्या...

नवी दिल्ली : जर तुम्हालाही सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस (Post Office) हा उत्तम पर्याय आहे. बहुतेक लोकांना पोस्ट ऑफिसमध्ये स्मॉल सेव्हिंग अकाउंटमध्ये (Small Saving Account) गुंतवणूक करायला आवडते. अशा स्थितीत पोस्ट ऑफिस वेळोवेळी योजना सुरू करत असते. पोस्ट ऑफिसकडून प्रीमियम सेव्हिंग अकाउंट अंतर्गत (Premium Saving Account) अनेक सुविधा दिल्या जात आहेत. प्रीमियम सेव्हिंग अकाउंट अंतर्गत लोकांना कॅशबॅकपासून लोन, डोअरस्टेप बँकिंगपर्यंतच्या शानदार सुविधा मिळत आहेत. 

जाणून घ्या, पोस्ट ऑफिसच्या प्रीमियम सेव्हिंग अकाउंटची खासियत...
- पोस्ट ऑफिस योजनांमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या प्रीमियम सेव्हिंग अकाउंटमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत.
- यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड पैसे काढण्याची आणि जमा करण्याची (Money Deposit) सुविधा मिळते.
- यामध्ये इतर बँकांप्रमाणेच घरोघरी सुविधेचा लाभही मिळत आहे.
- या अंतर्गत कर्ज (पोस्ट ऑफिस लोन) देखील मिळू शकते.
- तसेच, कोणत्याही प्रकारचे बिल भरल्यास कॅशबॅक देखील मिळेल.
- यामध्ये फिजिकल आणि व्हर्च्युअल डेबिट कार्डही जारी केले जातात.

कोणत्या लोकांना मिळेल फायदा?
आता प्रश्न असा आहे की, या विशेष योजनेचा लाभ कोणाला मिळणार?  दरम्यान, आम्ही तुम्हाला सांगतो की 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही ग्राहक हे अकाउंट उघडू शकतो. परंतु तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की यासाठी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. पोस्टमास्तर किंवा पोस्ट ऑफिसच्या शाखेत जाऊन तुम्ही या शानदार सुविधेसह अकाउंट उघडू शकता.
   
प्रीमियम सेव्हिंग अकाउंटची माहिती
पोस्ट ऑफिस अंतर्गत प्रीमियम सेव्हिंग अकाउंट उघडल्यावर तुम्हाला जवळपास 149 रुपये जीएसटी भरावा लागेल. एवढेच नाही तर तुम्हाला वार्षिक 99 रुपये अधिक जीएसटीही भरावा लागेल. दरम्यान, या अकाऊंट अंतर्गत मिनिमम बॅलन्सची मर्यादा नाही, परंतु तरीही अकाउंट उघडताना तुम्हाला किमान 200 रुपये जमा करावे लागतील.

Web Title: post office scheme post office premium saving account details in hindi see here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.