नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) तुमचे खाते असेल आणि तुम्ही ते वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिस यावेळी आपल्या ग्राहकांना मोठी सुविधा देणार आहे. पोस्ट ऑफिसने एक नवीन नियम लागू केला आहे, ज्या अंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेले ग्राहक आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फंड ट्रान्सफर करू शकतात. आता पोस्ट ऑफिसमधून एनईएफटी (NEFT) आणि आरटीजीएसची (RTGS) सुविधा सुरू झाली आहे.
NEFT ची सुविधा सुरूपोस्ट ऑफिसने NEFT ची सुविधा सुरू केली आहे, तर RTGS ची सेवाही 31 मेपासून सुरू झाली आहे. म्हणजेच आता पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना पैसे पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच पोस्ट ऑफिसची सुविधा इतर बँकांप्रमाणे अधिक युजर्स फ्रेंडली बनत आहे. एवढेच नाही तर ही सुविधा तुमच्यासाठी 24 तास 7 दिवस उपलब्ध असणार आहे.
नियम आणि अटीबँकांकडून NEFT आणि RTGS सुविधा मिळत आहे. मात्र, आता पोस्ट ऑफिसही ही सुविधा देत आहे. NEFT आणि RTGS द्वारे दुसऱ्या खात्यात पैसे पाठवणे खूप सोपे झाले आहे. तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फंड ट्रान्सफर करू शकता. यासाठी काही अटी व शर्ती आहेत. NEFT मध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा नाही, तर RTGS मध्ये तुम्ही एकावेळी किमान 2 लाख रुपये पाठवू शकता.
किती द्यावे लागेल शुल्क?या सुविधेसाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. NEFT मध्ये 10 हजार रुपयांपर्यंत तुम्हाला 2.50 रुपयांसह जीएसटी भरावा लागेल. 10 हजार ते 1 लाख रुपयांसाठी 5 रुपयांसह जीएसटी भरावा लागेल. त्याचवेळी, 1 लाख ते 2 लाख रुपयांसाठी, 15 रुपयांसह जीएसटी भरावा लागेल आणि 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी 25 रुपयांसह जीएसटी भरावा लागेल.