Lokmat Money > बिझनेस न्यूज > PPF, NSC योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारचा धक्का; घसरणार लाभाचा टक्का?

PPF, NSC योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारचा धक्का; घसरणार लाभाचा टक्का?

आर्थिक व्यवहार विभाग सचिव अतनू चक्रवर्ती यांनी पुढच्या तिमाहीत छोट्या योजनांवरील व्याजदरात घट करण्याचे संकेत दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 03:59 PM2020-02-03T15:59:57+5:302020-02-03T16:01:53+5:30

आर्थिक व्यवहार विभाग सचिव अतनू चक्रवर्ती यांनी पुढच्या तिमाहीत छोट्या योजनांवरील व्याजदरात घट करण्याचे संकेत दिले आहेत.

post office small saving scheme interest on ppf sukanya samridhi schemes may come down | PPF, NSC योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारचा धक्का; घसरणार लाभाचा टक्का?

PPF, NSC योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारचा धक्का; घसरणार लाभाचा टक्का?

Highlightsआर्थिक व्यवहार विभाग सचिव अतनू चक्रवर्ती यांनी पुढच्या तिमाहीत छोट्या योजनांवरील व्याजदरात घट करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या बाजारात असलेल्या वेगवेगळ्या योजनांवरच्या व्याजदरांना संतुलित करण्यात येणार आहेत. तसेच या नव्या व्याजदरांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना लाभ मिळणार आहे.

नवी दिल्लीः आर्थिक व्यवहार विभाग सचिव अतनू चक्रवर्ती यांनी पुढच्या तिमाहीत छोट्या योजनांवरील व्याजदरात घट करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या बाजारात असलेल्या वेगवेगळ्या योजनांवरच्या व्याजदरांना संतुलित करण्यात येणार आहेत. तसेच या नव्या व्याजदरांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना लाभ मिळणार आहे.

चालू तिमाहीत सरकारनं पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि राष्ट्रीय बचत पत्रासह लघु बचत योजनांवरच्या व्याजदरात कपात करण्याचे रिपोर्टमधून सूतोवाच केले आहेत. देशात सद्यस्थितीत 12 लाख कोटी रुपयांच्या लघू बचत योजना आहेत. जवळपास 114 लाख कोटी रुपये बँकेत जमा आहेत, त्यामुळे बँकेतील भांडवल प्रभावित होत आहे, अशी माहिती चक्रवर्ती यांनी दिली आहे. 

एखादा कमकुवत व्यक्ती जास्त शक्तिशाली व्यक्तीला नियंत्रित करतो, अशी परिस्थिती सध्या योजनांच्या बाबतीत लागू आहे. त्यामुळे लघू योजनांचे व्याजदर हेसुद्धा काही प्रमाणात मोठ्या योजनांच्या व्याजदरांसारखे असणं आवश्यक आहे. श्यामला गोपीनाथ समितीच्या रिपोर्टचा स्वीकार करण्यात आलेला असून, व्याजदरांना बाजारांच्या दरांशी जोडण्याचं काम सुरू आहे. या तिमाहीत हे व्याजदरांच्या माध्यमातून चांगले संकेत मिळणार आहेत. 

छोट्या बचत योजनांमधले सध्याचे व्याजदर

>> पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund (PPF interest Rate): 7.9%
>> सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme Interest Rate): 8.4%

>> वरिष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme Interest Rate): 8.6%
>> नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट्स (National Savings Certificate (NSC) Interest Rate): 7.9%
>> किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra (KVP) Interest Rate): 7.6%
>> नॅशनल सेव्हिंग्स मंथली इन्कम अकाउंट (Monthly Income Scheme Account, MIS Interest Rate): 7.6%
>> नॅशनल सेव्हिंग्स रेकरिंग डिपॉझिट अकाउंट (National Savings Recurring Deposit Account Interest Rate): 7.2%
 

Web Title: post office small saving scheme interest on ppf sukanya samridhi schemes may come down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.