Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office Sukanya Samriddhi Yojana : 'या' सरकारी स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; टॅक्स सुटीचाही मिळणार फायदा

Post Office Sukanya Samriddhi Yojana : 'या' सरकारी स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; टॅक्स सुटीचाही मिळणार फायदा

पाहा कोणती आहे ही स्कीम आणि काय मिळतोय फायदा.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 01:05 PM2022-03-07T13:05:18+5:302022-03-07T13:12:17+5:30

पाहा कोणती आहे ही स्कीम आणि काय मिळतोय फायदा.

Post Office Sukanya Samriddhi Yojana The highest interest earned You will also get the benefit of tax benefits know more about investment | Post Office Sukanya Samriddhi Yojana : 'या' सरकारी स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; टॅक्स सुटीचाही मिळणार फायदा

Post Office Sukanya Samriddhi Yojana : 'या' सरकारी स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; टॅक्स सुटीचाही मिळणार फायदा

जर तुम्ही आगामी काळात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या (Post Office) सेव्हिंग स्कीम्समध्ये (Saving Schemes) ते करू शकता. या स्कीम्समध्ये तुम्हाला नक्कीच चांगले रिटर्न मिळतो. तसंच यामध्ये गुंतवलेले पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात. जर बँक डिफॉल्ट (Bank Dfault) झाली तर तुम्हाला केवळ ५ लाख रुपये परत मिळतात. परंतु पोस्ट ऑफिसमध्ये असं होत नाही. पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग स्कीम्स अगती कमी रकमेच्या माध्यमातूनही सुरू केल्या जाऊ शकतात. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये सुकन्या समृद्धी योजना (SSY) सामिल आहे. पाहूया या स्कीमबद्दल अधिक माहिती.

व्याज दर
पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना सध्या वार्षिक ७.६ टक्के व्याजदर देते. हा व्याजदर १ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आलाय. या लहान बचत योजनेतील व्याज वार्षिक आधारावर कंपाऊंड आणि कॅलक्युलेट केले जाते. 

गुंतवणुकीची रक्कम
या सरकारी योजनेत, एखाद्या व्यक्तीला एका आर्थिक वर्षात किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. यानंतर तुम्हाला ५० रुपयांच्या पटीत जमा करावे लागेल. एका महिन्यात किंवा आर्थिक वर्षात ठेवींच्या संख्येवर मर्यादा नाही.

कोण उघडू शकतो खातं?
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, एक पालक १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर खाते उघडू शकतो. या योजनेत, भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही बँकेत मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते. हे खाते कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते. जुळी किंवा तिळी मुले असल्यास दोनपेक्षा जास्त खाती उघडता येतात. या सरकारी स्कीममध्ये जमा केलेल्या रकमेवर कर नियमानुसार सेक्शन 80C अंतर्गत डिडक्शनसाठी क्लेम करता येतो.

मॅच्युरिटी
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत, खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी ते मॅच्युअर होईल. याशिवाय मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्नाच्या वेळीही ते बंद केले जाऊ शकते. लग्नाच्या तारखेच्या एक महिना आधी किंवा तीन महिने आधी ही प्रक्रिया करावी लागते.

Web Title: Post Office Sukanya Samriddhi Yojana The highest interest earned You will also get the benefit of tax benefits know more about investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.