Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office v/s SBI: कोण मिळवून देतो तुम्हाला सर्वाधिक फायदा ?

Post Office v/s SBI: कोण मिळवून देतो तुम्हाला सर्वाधिक फायदा ?

मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यास भारतीय लोक सुरक्षित समजतात. यात तुम्हाला मर्यादित वेळेमध्ये खात्रीलायक परतावा मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 09:30 AM2018-09-25T09:30:22+5:302018-09-25T09:35:18+5:30

मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यास भारतीय लोक सुरक्षित समजतात. यात तुम्हाला मर्यादित वेळेमध्ये खात्रीलायक परतावा मिळतो.

Post Office v/s SBI: know where you can best return on fixed deposit post office or sbi | Post Office v/s SBI: कोण मिळवून देतो तुम्हाला सर्वाधिक फायदा ?

Post Office v/s SBI: कोण मिळवून देतो तुम्हाला सर्वाधिक फायदा ?

नवी दिल्ली- मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यास भारतीय लोक सुरक्षित समजतात. यात तुम्हाला मर्यादित वेळेमध्ये खात्रीलायक परतावा मिळतो. जास्त रक्कम बँकेत जमा करण्यास काहीशी भीती बाळगत असलेले लोक मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवणुकीला प्राधान्य देतात. विशेष म्हणजे मुदत ठेवीमध्ये गुंतवणूकदारांना कोणताही कर भरावा लागत नाही. त्यांना करातून सूट मिळते. परंतु या योजनेत एकदा पैसे गुंतवल्यानंतर गुंतवणूकदार पाच वर्षांपर्यंत ते पैसे काढू शकत नाही. आता जाणून घेऊ यात एसबीआय बँक आणि पोस्ट ऑफिस बँक या दोन पर्यायांपैकी मुदत ठेवीवर कोण तुम्हाला जास्त नफा मिळवून देऊ शकते. 

  • पैशांची सुरक्षितता-  एसबीआयमधलं मुदत ठेव खातं आणि पोस्ट ऑफिसमधलं खातं दोन्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवतात. त्यामुळे ग्राहकांसाठी दोन्हीही चांगले पर्याय आहेत. विशेष म्हणजे ज्यांना पैशांच्या बाबतीत जोखीम घ्यावीशी वाटत नाही, ते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुदत ठेवीत गुंतवणूक करू शकतात.
  • कुठे मिळतो जास्त फायदा- जर SBI आणि पोस्ट ऑफिसची तुलना करायची झाल्यास पोस्ट ऑफिसमधल्या मुदत ठेवीचा चांगला पर्याय आहे. कारण पोस्टात तुम्ही एफडी काढल्यास तुम्हाला वर्षाला 6.90 टक्के व्याज मिळतं. तर एसबीआयमध्ये एफडी केल्यास 6.6 टक्के व्याज मिळतं. 
  • मर्यादित कालावधीपूर्वी काढू शकता रक्कम- तुम्ही एफडीमध्ये गुंतवलेला पैसा मर्यादित कालावधीपूर्वी काढू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला कर भरावा लागणार आहे. 
  • SBI फिक्स्ड FD रेट- स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्च 2018मध्ये एफडीआय इंटरेस्ट रेट वाढवले आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं 10 वर्षांसाठी 1 कोटी किंवा त्याहून कमी रकमेची एफडी ठेवल्यास 5.75 टक्क्यांपासून 6.75 टक्के इंटरेस्ट देतो आहे.


SBIचे रेट ऑफ इंटरेस्ट लिस्ट: तुम्ही 1 हजार रुपयांच्या मिनिमम बॅलन्ससह फिक्स्ड डिपॉझिट खातं उघडू शकता. तसेच एसबीआयमध्ये फिक्स्ड डिपॉझिट कोणतीही जास्तीची मर्यादा नाही.
 
पोस्ट ऑफिस एफडी इंटरेस्ट रेटः गुंतवणूकदार पोस्टातल्या बँकेतही एफडी करू शकतात. तसेच पोस्टात तुम्ही धनादेशाच्या माध्यमातूनही अकाऊंट उघडू शकता. अधिक माहितीसाठी गुंतवणूकदार पोस्टाच्या indiapost.gov.in या साइटवरून माहिती मिळवू शकतात.  

Web Title: Post Office v/s SBI: know where you can best return on fixed deposit post office or sbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.